ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ST प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

Attempt to trap ST passengers in a dilemma on the eve of Diwali

 

 

 

लालपरी अर्थात एसटी बस सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कायम तत्पर असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या सोयीसाठी वर्षातील बाराही महिने एसटी महामंडळाकडून सेवा दिली जाते.

आमदाराचा पुतण्याच प्रतिआमदार बनून थेट सरकारी कार्यक्रमात

मात्र, आता ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या मागण्यांसाठी एसटी प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील संघटनेकडून केला जाण्याची शक्यता आहे. या संपाचा फटका राज्यातील लाखो प्रवाशांना बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन करू असा इशारा सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे.

राज्यात पुढील दोन आठवडे जोरदार पाऊस

मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवा शक्ती एसटी कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

वेतन, भत्ते, सातवा वेतन आयोग आणि दिवाळी बोनस यांसह विविध मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा 28 सप्टेंबरपासून ‘आक्रमक आंदोलन’ आणि 1 ऑक्टोबरपासून मुंबईतील मुख्यालयासमोर सर्व स्तरांवरील कर्मचारी उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे.

 

एसटी मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी धरणे आंदोलन छेडण्याचा 28 सप्टेंबरपासून आक्रमक आंदोलन सुरू होणार असून, 1 ऑक्टोबरपासून मुंबईतील इशारा देण्यात आला आहे.

भामटे बनावट आयकर अधिकाऱ्यांनी घरावर टाकला छापा

रिक्त पदांवर नवीन भरती करावी. खासगी बस घेऊ नयेत, राज्य परिवहन महामंडळाच्या स्वतःच्या बस वापराव्यात. महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावा.

 

2015 पासून जी प्रवास भाडेवाढ झाली आहे त्याची पूर्वलक्षीपणे पूर्तता करावी. याशिवाय, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ द्यावा, यांसह अशा विविध मागण्या आहेत.

 

गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला.

 

यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक

VIDEO;ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा धक्का,आता भारतीयांना भरावे लागणार १ लाख डॉलर शुल्क

त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक -अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

 

 

Related Articles