प्रश्न निवडणूक आयोगाला;बीजेपी ,शिंदेंना मिरच्या का लागतात
Question to Election Commission; Why do BJP and Shinde need chillies?

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. राज्यातील निवडणूक आयोगाकडे निष्पक्षपणे निवडणुका घेण्याची मागणी करत
मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच विरोधी पक्षातील काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रश्नांचा भडिमार सुरु केला आहे.
निवडणूक आयोगाविरुद्ध 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्ष मोर्चा काढणार असल्याचं रविवारी जाहीर करण्यात आलं. रविवारी मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी महाराष्ट्रात 96 लाख बोगस मतदार घुसवल्याचा आरोप केला. या साऱ्या गोष्टींसंदर्भात बोलताना राऊतांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.
“काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये भाषण केलं. या भाषणामध्ये त्यांनी खास करून निवडणूक आयोग, निवडणूक यादीमधील घोटाळे, निवडणूक यंत्रणेचा भ्रष्टाचार यावर भाष्य केलं.
उमेदवारी न मिळाल्याने राजद नेते शर्ट फाडून रडू लागला ;पाहा ;VIDEO
त्याच्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आजही महाराष्ट्रातल्या निवडणूक मतदार यादीमधील साधारण 96 लाख मतदार बोगस आहेत. आपण ज्याला राऊंड फिगर म्हणतो तो आकडा एक कोटी आहे.
एक कोटी मतदार बोगस असल्यामुळे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे. आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये चार दिवसात साडेसहा लाख मतदान वाढवले.
मोठ्या नेत्याचे वक्तव्य ,’राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका’
हा काय प्रकार आहे? कुठून येतात? अमित शहा म्हणतात दोन दिवसांपूर्वी दिल्लीत आम्ही घुसखोरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असेल तर आम्ही त्यांना हाकलून देऊ.
मतदार यादीतून महाराष्ट्रामध्ये एक लाख बोगस मतदार आणि घोसखोर आहे असे आम्ही मानतो. अमित शहा यांनी एक कोटी मतदार घुसखोर आहेत हे लक्षात घेऊन तुमच्या भाजपमध्ये मिंधे लोकांनी घुसवले आहेत. तिथून घुसखोरांना हाकलण्याची सुरुवात करा,” असं राऊत म्हणाले.
“मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाहीत. त्यासाठी देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर
खळबळजनक घटना;धावत्या रेल्वेतून तिघांना फेकले
एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं त्यात काल घोषणा झाली,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं. “काल शिवसेना भवनात पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय नेते होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते. काँग्रेसचे नेते हजार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते आणि आता हळूहळू त्या संदर्भात पाऊलं पडत आहेत,” असं राऊत यांनी सांगितलं.
दिवाळीवरचा मुस्लिम तरुणाचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
“निवडणूक आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या भरोशावर युतीवाले बोलत आहेत? निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून दोन दिवस 14 15 तारखेला शिष्टमंडळ भेटलं काय कारवाई केली? पुरावे दिले ना?
विधानसभा लोकसभा निवडणुकीदरम्यान शेवटच्या क्षणाला मतदान झालं. त्यातलं 46 लाख ते 50 लाख मतदान एकाच पक्षाला कसं काय पडू शकतं? का दुसरं कोणी येथे निवडणुकीला उभे नव्हते का?
ज्या चोराला रंगे हात पकडला आहे तो चोरच पुरावा मागत आहे. चोर पुरावा कोणाकडून मागत आहे? हे चोर आहेत यांनी चोऱ्या केलेल्या आहेत. आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे
1 नोव्हेंबरला राज्यात विरोधकांचा निवडणूक आयोगावर विराट मोर्चा
भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही. आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे. ते उत्तर देतील. भारतीय जनता पक्षाला किंवा मिंधे यांना मिरच्या का लागत आहेत.
त्यांची तडफड का होत आहे? चोराच्या मनात चांदणे. आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला जसे केंद्रात राहुल गांधी सवाल विचार होते. निवडणूक आयोगाला उत्तर कोण देत आहे
आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका;नेत्याचे खळबळजनक विधान
तर भाजपचे नेते! काय गरज आहे तुम्हाला? जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असेल मिंधे उत्तर देत असेल याचा अर्थ निवडणूक आयोगाने या सगळ्यांची मिली भगत आहे. हे जॉईंट वेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यामध्ये,” असा टोला राऊतांनी लगावला.







