रात्री गाडीने जाऊ; ड्रायव्हरने अजितदादांना दिला होता सल्ला
Let's go by car at night; the driver had given this advice to Ajitdada.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
आज अजित पवारांच्या होत्या चार सभा
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. पण,
हादरलेले कुटुंबीय,आता दादांच्या मृत्यूची बातमी साहेबांना कशी द्यायची
अपघाताच्या एक दिवस आधी अजित दादांना ड्रायव्हरने सल्ला दिला होता. पण अजित दादांनी तो ऐकला नाही. आज मी माझं सर्वस्व गमावल्याची भावना चालक श्यामराव नारायण मनवे यांनी व्यक्त केल्या आहेत.
अपघाताच्या आदल्या रात्री (मंगळवारी) अजितदादांच्या गाडी चालकाने त्यांना रात्रीच गाडीने पुण्याला किंवा बारामतीला जाण्याचा सल्ला दिला होता. मुंबईतील बैठक लवकर संपल्याने चालक श्यामराव नारायण मनवे (वय ७१) यांनी दादांना सांगितले, “दादा, रात्रीच कारने निघूया, सकाळी आरामात पोहोचू.” पण दादांनी ते ऐकले नाही. त्यांनी चालकाला सांगितले, “तू पुण्याला ये, मी सभा आटोपून सकाळीच पुण्यात येतो.”
आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कमान कोणाच्या हाती ? उत्तर सापडले
श्यामराव मनवे माध्यमांशी बोलताना भावूक झाले. ते म्हणाले, “दादा माझे दैवत होते. मी 20 जानेवारी 1999 पासून त्यांच्यासोबत चालक म्हणून काम करतोय. 2013 मध्ये मी निवृत्त झालो,
तरी दादांसोबतच राहिलो. दादा माझ्या घरी गणपतीत जेवायला आले होते. सकाळी 7:30 वाजता ते मुंबईतील बंगल्यावरून निघाले आणि काही वेळातच ही भीषण घटना घडली. दादांनी माझे ऐकले असते तर कदाचित ही दुर्दैवी घटना टळली असती. आता माझे आयुष्यच थांबलंय, सर्वस्व गमावल्यासारखं वाटतंय.”
BRAKING NEWS;विमान दुर्घटना टळली! माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले
अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जाहीर सभांसाठी जात होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांचे चार कार्यक्रम नियोजित होते.
मात्र, विमान बारामती विमानतळावर लँडिंग करताना दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे विमानाचा अपघात झाला. विमान धावपट्टीवरून बाजूला गेले. त्यानंतर विमानाने पेट घेतला. या अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला.
बारामतीत अपघाताची बातमी समजताच कार्यकर्ते आणि समर्थकांचा जनसागर लोटला. अंत्यदर्शनासाठी मेडिकल कॉलेजबाहेर मोठी गर्दी झाली होती. अजितदादांच्या अचानक निघून जाण्याने महाराष्ट्राने एक कणखर, मेहनती आणि लोकप्रिय नेता गमावला आहे.
विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात मोठी घोषणा
दरम्यान या विमान अपघाताचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. अचानक विमान एका बाजूला झुकल्याचे काही व्हिडीओंमध्ये स्पष्ट दिसत आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदात झाला. त्यावेळी या भीषण अपघातातून फक्त एकच प्रवासी वाचला..
11 नंबर सीट असलेला एक प्रवासी अहमदाबादच्या विमान अपघातातून वाचला. त्यावेळीपासून विमानातील सर्वात सुरक्षित सीट हे 11 नंबरचे असल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघातात 11 A नंबरनेच घात केल्याचे स्पष्ट आहे. अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीला निघालेले विमान बारामतीच्या धावपट्टी 11 वर उतरणार होते, तशी परवानगी देण्यात आली होती.
आज अजित पवारांच्या होत्या चार सभा
मात्र, धावपट्टीच्या लगत असलेल्या शेतात विमान कोसळले. बारामती विमानतळावरील 11 नंबरची धावपट्टी उंचावर आहे. ज्यामुळे येथे विमान उतरवणे म्हणजे मोठे आव्हान असते. खडकाळ भागावरील हा टेबलटॉप रनवे आहे. याच 11 नंबरच्या धावपट्टीने घात केला. ज्यावेळी हा अपघात झाला होता, त्यावेळी व्हिजिबिलीटी कमी असल्याचेही सांगितले जात आहे. पायलटने ATC ला याबाबत माहितीही दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पायलटने एक चक्कर मारली होती, त्यानंतर अचानक विमान वेगाने खाली येताना दिसत आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे,
हादरलेले कुटुंबीय,आता दादांच्या मृत्यूची बातमी साहेबांना कशी द्यायची
तसा प्राथमिक अंदाज आहे. अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटचा प्रचंड मोठा अनुभव होता. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघाताने देशभरात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांचे निधन झाले, यावर अजूनही कोणाला विश्वास बसत नाही.









