राज्याच्या अर्थसंकल्पातील फडणवीसांच्या मोठ्या घोषणा
Fadnavis' big announcements in the state budget

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या २०२६-२७ चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी विविध पायाभूत सुविधा, महिला, शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा केल्या.
या अर्थसंकल्पात त्यांनी बळीराजाला केंद्रस्थानी ठेवत कृषी आणि ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शेती क्षेत्रातील आधुनिकता, शेतकऱ्यांची सुरक्षा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांना बळकटी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात नमूद केले.
बळीराजाच्या सोबतच शेतात राबणाऱ्या हातांना सुरक्षा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता गोपीनाथ मुंडे अपघात अनुदान योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील शेतमजुरांचाही समावेश केला जाणार आहे. यामुळे शेतमजुरांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
इराणच्या धमकीने अमेरिकेला फुटला घाम
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?
शेतमजुरांचा विमा योजनेत समावेश: गोपीनाथ मुंडे अपघात अनुदान योजनेचा विस्तार करून आता त्यात शेतमजुरांनाही विमा संरक्षण दिले जाईल.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजना: शेतात जाण्यासाठी सोयीचे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात येत आहे.
शिंदेंनी दिली कबुली, इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता
नैसर्गिक शेती अभियान: आगामी दोन वर्षांत संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान’ राबवले जाणार आहे.
महिला शेतकरी व गोपालकांसाठी योजना: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने महिला गोपालक, शेळीपालक आणि कुक्कुटपालकांसाठी विशेष आर्थिक योजना राबवण्यात येतील.
ग्रामसडक योजना टप्पा ३: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात २३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांची कामे हाती घेतली जातील.
कृषी मूल्य साखळी: १० ते १५ महत्त्वाच्या ठिकाणांसाठी एकत्रित ‘व्हॅल्यू चेन’ (मूल्य साखळी) तयार करून शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून दिली जाईल.
राहुल गांधींचा शब्द खरा ठरला ,अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची ‘तात्पुरती परवानगी
अॅग्रीस्टॅक आणि फार्मर आयडी: आतापर्यंत १ कोटी ३१ लाख फार्मर आयडी तयार झाले असून, फेब्रुवारीपर्यंत उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये शेती कामांसाठी ‘एआय’ची मदत घेतली जात आहे.
हवामान व बाजारभाव माहिती: ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट हवामान आणि बाजारभावाची अचूक माहिती पुरवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री मत्स्य योजना: मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी १ कोटी रुपयांची विशेष योजना राबवली जाणार आहे.
भांडवली गुंतवणूक: पुढील चार वर्षांत शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी मोठी भांडवली गुंतवणूक केली जाईल.
अधिवेशनात आमदाराची तब्बेत बिघडली ,रुग्णालयात हलवले
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये आगामी दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासोबतच महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत.
अजित दादांच्या अपघातावर आमदार अमोल मिटकरींचे खळबळजनक वक्तव्य
आता शेत मजुरांचा सामावेश देखील गोपीनाथ मुंडे मंडळात करण्यात येणार असून, त्याचा मोठा फयदा या शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजनेची घोषणा देखील आजच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.
इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र महाप्रहार
१ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मुंबईकरांना काय मिळणार?
ऐरोली ते कटई नाका भाग तीनचे काम पूर्ण होत आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग बनवणार. अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार, मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार.
राज्यसभेच्या तिकिटासाठी लग्नमंडपातून धावपळ
अटल सेतूला नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी उलवे किनारी प्रकल्प पूर्ण करणार. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी २०२८ पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत, अशा काही महत्त्वाच्या घोषमा देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.
पर्यटन क्षेत्राचा विकास
निवडक ५० पर्यटन स्थळी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासोबतच वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प नियोजित केला आहे.
राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन
राज्यातील तिसरी चित्रनगरी नागपूर येथे होईल, चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, ५ ज्योतिर्लिंगांसाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय सोपवले आहेत, त्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, अशी घोषणाही यावेळी फडणीस यांनी केली आहे.
ग्राम सडक योजना
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत २३ हजार किमीचे रस्ते तसेच पुलांची कामे हाती घेतली जातील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
इराणचा इस्राईल,अमेरिकन तळांवर चौफेर हल्ला
गाव जोडणी योजना
तसेच १ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल अशी मोठी घोषणाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.









