मोदींनी देशाची बदनामी थांबवावी;संजय राऊत
Modi should stop defaming the country: Sanjay Raut
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. परराष्ट्र धोरणापासून ते देशातील गॅस टंचाईपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर राऊत यांनी सरकारला धारेवर धरले.
पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना राऊत म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणे आता थांबवायला हवे. संघर्ष थांबवण्याची क्षमता जर मोदींकडे असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते.”
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे भारतात ECA कायदा लागू , नेमकं काय आहे कायदा
या संघर्षाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असून मोदी त्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या दबावामुळेच मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अचानक मागे घेतले.
आम्ही कोणाकडून तेल खरेदी करायचे, याची परवानगी आता ट्रम्प देत आहेत, हा भारताचा अपमान आहे,” असेही ते म्हणाले.
फारुख अब्दुल्लांवर जीवघेना हल्ला,हल्लेखोराला अटक ,पाहा LIVE VIDEO
देशातील इंधन टंचाईवर बोलताना राऊत यांनी शिर्डीच्या साई संस्थानाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “देशात एलपीजी गॅससाठी रांगा लागल्या आहेत. इंधन आणि गॅस नसल्यामुळे शिर्डीत प्रसादाचे दोन ऐवजी आता एकच लाडू दिला जात आहे.
जेवणात दोन चपात्यांऐवजी एकच चपाती दिली जात आहे.” मुंबईतील 40 टक्के रेस्टॉरंट्स बंद झाली असून हजारो लोकांचा रोजगार गेला आहे, ही देशाच्या पंतप्रधानांची मोठी बदनामी असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; रस्त्यावर नोटांचा खच पडला
लडाखमधील आंदोलक सोनम वांगचुक यांच्या अटकेवरूनही राऊतांनी सरकारला आरसा दाखवला. “ज्या शिक्षण तज्ज्ञाचे मॉडेल जगाने मान्य केले,
तो जेव्हा सरकारला प्रश्न विचारतो तेव्हा तो तुमच्यासाठी राष्ट्रद्रोही ठरतो. देशातले सगळे गुंड आणि राष्ट्रद्रोही भाजपने आपल्या पक्षात घेऊन शुद्ध केले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
सोन्याच्या किमतीत घसरण ? आता दर वाढणार की कमी होणार?
निवडणूक आयोगावर अविश्वास व्यक्त करताना राऊत म्हणाले की, “निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची एक ‘एक्स्टेंडेड ब्रँच’ (विस्तारित शाखा) म्हणून काम करत आहे. आयोगाने आपली पत्रकार परिषद भाजपच्या कार्यालयातच घ्यायला हवी. देशाचा त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही.”
पंतप्रधान मोदींच्या प्रोटोकॉलवर टीका करताना राऊत म्हणाले की, “मोदींनी प्रोटोकॉलच्या गप्पा मारू नयेत. नवीन संसद भवन आणि राम मंदिराच्या उद्घाटनाला तुम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले नाही. गेल्या १०-१२ वर्षांपासून देशात फक्त एकाच व्यक्तीला प्रोटोकॉल मिळतो, बाकी सगळे त्यांचे गुलाम आहेत.”









