मंत्रिपदावरुन कोकाटेंचा पत्ता कापण्यात खरातची भूमिका
Kharat's Role in Denying Kokate a Ministerial Berth

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेते हे सध्या अडचणीत आलेले दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांना खरात प्रकरणामुळे सर्वात मोठा झटका बसला आहे.
त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी गंभीर आरोप केला आहे.
लिंगपिसाट अशोक खरात याने अनेक महिलांचं शोषण केले आहे. त्यामुळे याला तर शिक्षा झालीच पाहिजे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आणि काल महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे.
पण त्यांनी फक्त राजीनामा देऊन काही होणार नाही. त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण गरजेचं आहे. त्याचबरोबर सुनील तटकरे यांनादेखील सहआरोपी करणे गरजेचं आहे.
तापमान वाढणार; विजांसह पावसाची शक्यता
कारण रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे या अशोक खरातच्या नेहमी संपर्कात होते आणि त्यांना भेटायला जायचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे या दोघांना सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी विकास लवांडे यांनी केली.
सिन्नर तालुक्यातील हा अशोक खरात बाबा होता पण त्याला स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे हे विरोध करायचे. या बाबासोबत त्यांचा एक फोटो आणि व्हिडिओ समोर आलेला नाही.
पण याच माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून या अशोक खरात याने सुनील तटकरे यांना आग्रह धरला होता,
तो त्यासाठी तटकरेंना फोन करायचा की नाही? याचा खुलासा सुनील तटकरे यांनी केला पाहिजे आणि माणिकराव कोकाटे यांनीही याबाबत बोलले पाहिजे, असेही विकास लवांडे यांनी म्हटले.
भोंदू अशोक खरातच्या संपर्कात सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी असल्याचा गंभीर आरोप अंधश्रद्दा निर्मुलन समितीकडून (अंनिस) करण्यात आला आहे.
विधान परिषदेच्या 9 जागासाठी होणार निवडणूक ,कोणाची लॉटरी लागणार ?
याच लोकप्रतिनिधीने निवडणूक झाल्यानंतर नाशिकच्या अंबड परिसरात ठेवण्यात येणारे मतदान यंत्र सुरक्षित राहावे, यासाठी खाजगी सुरक्षा रक्षक नेमून जादूटोणा केल्याचा संशय आहे.
या लोकप्रतिनिधीच्या प्रचारात भोंदू बाबा अशोक खरात 1999 पासून काम करत होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली.








