‘मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडला’, संजय राऊत

'Modi has contracted a national disease of lying,' says Sanjay Raut.

 

 

लोकसभेत नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि. 18) देशाला संबोधित केले. विरोधकांनी विधेयकाची भ्रूणहत्या केली, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

 

आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी. काँग्रेसमुक्त भारत म्हणणारे मोदी काल फक्त काँग्रेसचं नाव घेत होते, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

राज्यावर दुहेरी संकट :घराबाहेर पडणे टाळा

संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी काय बोलत आहेत याकडे देश गांभीर्याने पाहत नाही. ते आचारसंहितेचा भंग करत आहेत. खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार त्यांना जडलेला आहे.

 

2023 साली मंजूर झालेलं महिला आरक्षणाचं विधेयक यांनी अद्याप अंमलात आणलेले नाही. याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे.

 

मुंबईत बिबट्या शिरला, जनतेत खळबळ

डीलिमिटेशन बिल तुमच्या मर्जीनुसार तुम्ही आणत होता, त्याचा पराभव झाला आहे. हे राष्ट्रावर संकट नसून भारतीय जनता पक्षावर संकट आहे. भारतीय जनता पक्षाच्या संकटासाठी राष्ट्राला संबोधित करणं हा मूर्खपणा असल्याची त्यांनी केलीय.

 

महिला आरक्षणाच्या नावाखाली जे छाती पिटून घेताय, आक्रोश, ढोंग करताय, त्यांनी 2023 साली संसदेत काय झाले ते एकदा तपासून घ्यायला पाहिजे. मोदींच्या कालच्या भाषणात 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता.

 

अशोक खरातचा इन्काउंटर होणार , रोहित पवारांनी भविष्यवाणी

ते काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते. मात्र, त्यांच्या डोक्यातून अद्याप काँग्रेस गेलेली नाही. मोदी कळत नकळतपणे सांगत आहेत की, काँग्रेस शिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही. मोदी त्यांच्या कृतीतून वारंवार हे सिद्ध करत आहे, अशी टीका देखील संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

 

मुंबईत बिबट्या शिरला, जनतेत खळबळ
संजय राऊत पुढे म्हणाले की, मोदींना कधी लव्ह जिहादच्या नावाखाली तर कधी धर्मांतराचे मुद्दे, तर कधी कोणी काय खावे असे मुद्दे निर्माण करून हा देश कायम पेटवायचा असतो.

 

पण, त्यांना असे कधीही वाटत नाही की, काश्मीरमधील पहलगाम, पुलवामामध्ये असंख्य हिंदू मारले गेले. त्यांच्या सुद्धा माता भगिनी या महिला आहेत. त्या महिलांचा आक्रोश त्यांना कधीही दिसला नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय.

महाराष्ट्रावर मोठं संकट, राज्यात काही ठिकाणी शळांना सुट्टी;नागरिकांना सतर्कतेचं आवाहान

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करत महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विशेषतः काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका करत त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर विरोधकांचा विरोध हा देशाच्या प्रगतीस अडथळा असल्याचे म्हटले.

 

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात परिवारवादी राजकारणावर निशाणा साधत, अशा पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांना संसदेत पोहोचू द्यायचे नाही, असा आरोप केला. तसेच 21व्या शतकातील महिलांना सर्व घडामोडींची जाणीव असून त्या योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

महिला आरक्षण विधेयकावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात काँग्रेसचा अनेकदा उल्लेख केला. अंदाजे 60 वेळा काँग्रेसचे नाव घेत त्यांनी या पक्षावर राष्ट्रहिताला विरोध केल्याचा आरोप केला. विविध महत्त्वाच्या विधेयकांना काँग्रेसने विरोध केल्याचे सांगत त्यांनी तीन तलाक आणि समान नागरी कायदा (UCC) यांसारख्या मुद्द्यांचाही उल्लेख केला.

 

पंतप्रधानांनी केवळ काँग्रेसच नव्हे तर तृणमूल काँग्रेस , द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आणि समाजवादी पक्ष (Samajwadi Party) यांसारख्या पक्षांवरही निशाणा साधला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्या या पक्षांवर त्यांनी महिलांविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला.

 

 

ज्यावेळी महिलांच्या अधिकारांवर गदा येईल त्यावेळी त्याचा बदला घेतला जाईल. नारीशक्ती वंदन विधेयकाला ज्या लोकांनी विरोध केला, त्यांनी महिलांना गृहीत धरण्याची चूक केली. देशातील महिलांना विरोधकांची भूमिका समजली आहे. त्याचे परिणाम भोगावा लागणार, असं मोदी म्हणाले.

 

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक मतसंख्या मिळाली नसली तरी लढा थांबणार नाही. देशातील 100 टक्के नारीशक्तीचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत, असे म्हणत त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

या संबोधनामुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. महिला आरक्षणाचा मुद्दा आगामी काळात निवडणुकांमध्येही केंद्रस्थानी राहण्याची शक्यता असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

Related Articles