विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून या 5 जणांची नावे चर्चेत

Names of these 5 individuals from the Congress party are under consideration for the Legislative Council.

 

 

विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात होती,

मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय

मात्र उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे.

ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने दंड थोपटले

त्यामुळे आता या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. या निवडणुकीसाठी 5 नेत्यांची नावे चर्चेत आहेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली आहे. आता या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 5 नावे चर्चेत आहेत.

भारताकडे येणारे जहाज होर्मुझमधून इराणकडे घेऊन गेले

यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांच्या नावांचा समावेश आहे.

 

यातील बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे, त्यांना सभागृहाचा प्रचंड अनुभव आहे, त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

 

मंत्रिमंडळ बैठक 22/04/2026

महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसने जाहीर केले होते की, उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल,

 

मात्र जर दुसरा कोणी उमेदवार असेल तर आम्ही उमेदवार देणार. त्यानुसार अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे. आता वरीलपैकी एका नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

दीड कोटींच बिल मंजूर करण्यासाठी 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

अंबादास दानवे यांचं नाव जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे यांनी म्हटले की, ‘राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता.

 

त्याचवेळी आम्ही विधानसभेला शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषेदत असावेत, अशी आमची मागणी होती. मात्र आता अंबादास दानवेंना त्यांनी संधी दिली आहे, तर आमची काही हरकत नाही.’

आजपासून जमिनीच्या NA प्रक्रियेत बदल

 

 

Related Articles