ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण ; ४० जणांना अटक

Truck drivers' agitation turned violent; 40 people arrested

 

 

 

नवीन मोटार वाहन कायद्याला वाहन चालकांचा मोठा विरोध पाहायला मिळत आहे. या कायद्यावर आक्षेप नोंदवत ट्रक चालकांनी चोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

 

 

 

 

नवीन मोटार वाहन कायद्याला वाहन चालकांचा मोठा विरोध पाहायला मिळत आहे. या कायद्यावर आक्षेप नोंदवत ट्रक चालकांनी सोमवारी (१, जानेवारी) सकाळच्या सुमारास चिंचोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

 

 

 

या आंदोलनाला वसईमध्ये हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनकर्त्यांना बाजूला करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या हिंसक आंदोलनाप्रकरणी आता ४० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

 

रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षांची शिक्षा या नव्या कायद्या विरोधात ट्रक चालक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.

 

 

 

आज (१, जानेवारी) नवी मुंबईत उरण, कळंबोली, उलवे याठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. या आंदोलनाने जेएनपिटी मार्गावर हिंसक वळण घेतल्याचे पहायला मिळाले.

 

 

 

उलवे येथील सिमेंट कंपनी जवळ उभ्या असलेल्या ट्रक चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला.

 

 

यादरम्यान आंदोलनकर्त्या ट्रक चालकांनी पोलिसांवरच हल्ला चढवत लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

 

 

या हिंसक आंदोलन प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करुन 40 आंदोलनकर्त्या ट्रक चालकांना ताब्यात घेतले.

 

 

याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत असून यापुढे ट्रक चालकांनी आंदोलन करताना शांततेत करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले आहे.

 

 

दरम्यान रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षांची शिक्षा या नव्या कायद्या विरोधात ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. नवी मुंबईत उरण, कळंबोली, उलवे याठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारलं आहे.

 

दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून नवी मुंबईत ट्रकचालकांनी पोलिसांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

यावेळी बेलापूर उरण, सायन पनवेल आणि उरण जेएनपीटी मार्गावर रास्ता रोको देखील करण्यात आला यात पोलिसांनी मध्यस्थी करत मार्ग मोकळा केला. मात्र ट्रक चालकांच्या आक्रमक आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळाली.

 

 

वाहनाने अपघात घडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित वाहन चालकाविरोधात कठोर कारवाईचा कायदा नुकताच संमत करण्यात आला आहे. यामध्ये 7 लाख रुपयांचा दंड व दहा वर्ष कारावासाची तरतूद आहे.

 

 

हा कायदा रद्द करण्यासाठी आता चालक रस्त्यावर उतरलेत. बीडसह आष्टीमध्ये या प्रश्नावरून आंदोलन करण्यात आले असून हा कायदा रद्द करावा,

 

 

अन्यथा चक्काजामचा इशारा आता वाहनचालकांनी दिला आहे. या मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा चालकांनी दिला आहे.

 

 

सरकारने बनवलेल्या नव्या अपघात वाहन कायद्याविरोधात टँकर चालक आणि वाहतूकदार आक्रमक झाले असून पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर चालक आणि वाहतूकदार आजपासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकसह राज्यावर इंधन तुटवड्याचं संकट ओढवलं आहे.

 

 

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहने अडवून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मोठ्या संख्येने वाहन चालक एकत्र आले होते.

 

हिट अँड रन प्रकरणातील प्रस्तावित कायद्याअंतर्गत वाहन चालकांमध्ये प्रचंड नाराजी असून जिल्हा मोटार वाहक व मालवाहतूक असोसिएशन संघटनेने संप पुकारला आहे. यावेळी सरकारच्या या नव्या कायद्याचा वाहन चालकांनी केला निषेध केला

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *