छगन भुजबळांनी केलेल्या आरोपावर रोहित पवारांचा पलटवार

Rohit Pawar's counterattack on Chhagan Bhujbal's allegation

 

 

 

 

छगन भुजबळ हे मंत्री असताना त्यांना सभा घ्याव्या लागत आहेत, याचाच अर्थ या सरकारमध्ये मंत्र्यांच ऐकलं जात नाही हे स्पष्ट होतं. जर मंत्र्यांचं चालत नसेल

 

 

तर सामान्य लोकांचे या सरकारमध्ये काय चालणार असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

 

छगन भुजबळ यांनी राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनावेळी जो लाठीचार्ज झाला त्यानंतर मनोज जरांगे हे घरात जाऊन बसले होते.

 

 

 

मात्र राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी त्यांना घरातून आणून पुन्हा उपोषण स्थळी बसवले आणि त्यांना सांगितलं की शरद पवार साहेब आपल्या भेटीला येणार आहेत.

 

 

 

छगन भुजबळांच्या या टीकेनंतर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भुजबळ मंत्री असून त्यांना सभा घ्याव्या लागत आहेत, याचा अर्थ त्यांचं कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही. भुजबळांच्या या टीकेला मी योग्य वेळ आल्यानंतर उत्तर देईन.

 

 

 

 

रोहित पवार म्हणाले की, मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. केंद्र सरकारकडे जाऊन 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण कसं घेता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

 

 

 

 

जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते.

 

 

 

त्यावेळी बोलताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार (मनोज जरांगे) घरात जाऊन बसले. आमचे राजेश टोपे साहेब आणि छोटे साहेब रोहित पवार

 

 

 

यांनी त्याला (जरांगे) पहाटे तीन वाजता परत आणून बसवले. त्याला सांगितलं, शरद पवारसाहेब येणार आहेत. शरद पवारांना लाठीचार्ज का झाला, पोलिसांवर हल्ले कसे झाले हे सांगितलं नाही, असं भुजबळ म्हणाले.

 

 

 

यावेळी छगन भुजबळांनी जालन्यातील लाठीचार्जवरुन गंभीर आरोप केले. मनोज जरांगेंच्या आंदोलनावेळी 70 पोलिसांवर हल्ले झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

 

 

 

पण महाराष्ट्रासमोर चुकीचं चित्र गेलं. होममिनिस्टरच माफी मागू लागला,गुन्हे मागे घेऊ म्हणू लागला, त्यामुळे पोलिसांचं मनोबल खचलं, असं भुजबळ म्हणाले. तसंच ओबीसींचे बोर्ड फाडणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्याचा आदेश भुजबळांनी दिला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *