“या” दोन मतदारसंघात कमी मतदान;भाजपची धडधड वाढली

Low turnout in these two constituencies; BJP's pulse increased

 

 

 

 

भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील बूथनिहाय टक्केवारीचा अहवाल शहराध्यक्ष, तसेच जिल्हाध्यक्षांकडून मागविला आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांची धडधड वाढली आहे.

 

 

 

 

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत महायुतीसाठी प्रतिकूल वातावरण असल्याने महाजन यांनी या जागा जिंकण्यासाठी नाशिकमध्ये तीन दिवस तळ ठोकत मतदान वाढविण्यासाठी व्यूहरचना केली होती.

 

 

 

मात्र, तरीही नाशिक शहरातील तीन मतदारसंघांसह दिंडोरीतही अनेक ठिकाणी मतदान कमी झाले आहे. मतदानाची टक्केवारी वाढली असतानाही भाजपची ताकद असलेल्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे.

 

 

 

त्याची गंभीर दखल भाजपसह महाजन यांनी घेतली आहे. भाजपने ‘चारशेपार’चा नारा दिल्यानंतर प्रत्येक जागा जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती.

 

 

 

राज्यात त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीतही तोडफोड केली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.

 

 

 

भाजपने प्रत्येक जागा प्रतिष्ठेची करीत ती जिंकण्यासाठी व्यूहरचनाही तयार केली होती. मोठी रस्सीखेच झाल्यानंतर महायुतीत नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेली, तर दिंडोरीची जागा भाजपकडेच राहिली.

 

 

 

दिंडोरीत कांद्याच्या प्रश्नावरून डॉ. भारती पवार यांना विरोधाचा सामना करावा लागला. मंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर जनसंपर्क कमी झाल्याचा आरोप झाला.

 

 

 

सोबत पक्षांतर्गत विरोधाचाही सामना करावा लागला. त्यामुळे डॉ. पवार यांच्यासाठी दिंडोरीची निवडणूक सोपी राहिली नव्हती. दुसरीकडे नाशिकमध्येही हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपनेच विरोध केला होता,

 

 

 

 

तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांचे दिल्लीतून नाव पुढे येऊनही उमेदवारी दिली गेली नाही. त्यामुळे महायुतीविरोधात

 

 

 

नकारात्मक वातावरण तयार झाले होते. गोडसेंची उमेदवारी शेवटच्या दिवशी जाहीर झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाने नाशिकसह दिंडोरीत प्रचारापासून अंतर राखले होते.

 

 

 

नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांतील प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनविण्यासाठी महाजन यांनी नाशिकमध्ये तीन दिवस तळ ठोकला होता.

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर महाजन यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेत दोन्ही मतदारसंघांतील रणनीती ठरवली. प्रत्येक नाराज नेत्याशी ‘वन टू वन’ चर्चा करीत त्यांना प्रचारात सक्रिय केले. प्रत्येक मतदारापर्यंत यंत्रणा पोहोचवून त्याला मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व्यूहरचना तयार केली.

 

 

 

 

मात्र, तरीही अनेक ठिकाणी मतदान कमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाजन यांनी आता बूथनिहाय टक्केवारीचा अहवाल मागवला आहे.

 

 

 

महाजन यांनी शेवटपर्यत किल्ला लढवला. मात्र, आता बूथनिहाय आकडेवारी मागवून कोण कुठे कमी पडले याची जंत्रीच सादर केली जाणार असून,

 

 

 

 

त्याचा फटका संबंधितांना आगामी विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत बसणार असल्यामुळे सर्वांची धडधड वाढली आहे.

 

 

 

 

नाशिक शहरात ग्रामीण भागातील तीन विधानसभा मतदारसंघांपेक्षा शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांत मतदान कमी झाले आहे. विशेष म्हणजे तीनही मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत,

 

 

 

तर जिल्हा परिषदेतही भाजपची ताकद आहे. नाशिक शहरात महायुतीचे १०५ माजी नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेचेही पन्नासच्या आसपास माजी सदस्य आहेत.

 

 

 

 

नाशिक मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार, तर दिंडोरीत महायुतीचे सर्व सहा आमदार आहेत. मात्र, तरीही मतदानाचा टक्का

 

 

 

फारसा वाढला नसल्याने महाजन यांनी आता बूथनिहाय आकडेवारीचा अहवाल मागवून आमदारांसह, पदाधिकाऱ्यांची धडधड वाढविली आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *