NEET पेपरफुटीचे नांदेड कनेक्शन ;दोन शिक्षकांची चौकशी

NANDED CONNECTION OF NEET PAPERFUTI ;INQUIRY OF TWO TEACHERS

 

 

 

 

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली. बिहारमधून परीक्षेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करत पेपरफुटी प्रकरण घडले,

 

 

 

 

असल्याचा आरोप ठेवण्यात आला. पण बिहार हे एकमात्र राज्य नाही जिथे गैरकारभार झाला. आता पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातून दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

 

नांदेडच्या दहशतवादी विरोधी पथकाने नीटच्या पेपरफुटी प्रकरणात लातूरमधून दोन शिक्षकांना अटक केली आहे. बिहारमधून १३ लोकांना अटक करण्यात आल्यानंतर

 

 

महाराष्ट्रातूनही दोन लोकांना ताब्यात घेतल्यामुळे पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्राचे कनेक्शन आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 

 

संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना नांदेड एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

 

यापैकी एक शिक्षक लातूरमध्ये तर दुसरा सोलापूरमध्ये कार्यरत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आता दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे.

 

 

 

शनिवारी रात्री दोघांनाही लातूरमधून ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करून त्यांना सोडण्यात आले. मात्र पुन्हा चौकशी करण्याची

 

 

 

गरज भासल्यास बोलावले जाईल, अशी ताकीद त्यांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही शिक्षक लातूर जिल्ह्यात खासगी शिकवणी वर्ग चालवतात.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *