आर्किटेक्ट लीना प्रसाद आफळे यांना पी.एचडी. पदवी जाहीर
Architect Leena Prasad Afale awarded Ph.D. degree

छत्रपती संभाजीनगर : एमआयटी महाविद्यालयातील आर्किटेक्ट विभागातील असिस्टंट प्रोफेसर प्रा. लीना प्रसाद आफळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सिव्हिल इंजिनिअरिंग विषयात पी.एचडी. पदवी जाहीर केली आहे.
त्यांनी ‘इफेक्ट ऑफ क्लाईमॅटीक कंडीशन्स ऑन हेल्थ ऑफ रेसीडेंशीअल बिल्डिंग्स इन मराठवाडा रीजन’ या विषयावर डॉ. राजाराम दमगीर व डॉ. उमा जाधव
यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रबंध सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवणाऱ्या त्या मराठवाड्यातील पहिल्या महिला आर्किटेक्ट आहेत.