पूर्णेत 51 फुटी रावणाच्या दहनाला हजारोंचा जनसमुदाय उसळला

The 51-foot Ravana's burning in Purna drew a crowd of thousands

 

पूर्णा-शेख तौफिक/9970443024

 

 

मागील 27 वर्षांपासून अखंडितपणे पूर्णा शहरात राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते

 

यावर्षी विजयादशमी निमित्त शहरातील जुना मोंढा मैदानावर 51 फुटी महाकाय रावणाच्या पुतळ्याचे दहन शिवसेना ठाकरे गटाचेनेते खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते पार पडले.

पूर्णा शहरात श्री राजे संभाजी मित्र मंडळ दरवर्षी भव्य स्वरूपात नवरात्र महोत्सवात विजयादशमीच्या दिवशी भव्य रावण दहन व आतीषबाजीचा नयनरम्य सोहळा आयोजित करते

 

याहीवर्षी येथिल जुना मोंढा मैदानावर रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास शिवसेने ठाकरे गटाचे उपनेते खासदार संजय उर्फ बंडू जाधव,

 

शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव,सुधाकरराव खराटे,ह.भ.प सोपान काका बोबडे, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे,

 

साहेबदादा कदम,शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, रावसाहेब रेंगे,रामप्रसाद राणेर, हिराजी भोसले,रवी जयस्वाल, प्रा. गोविंद कदम,पो.नि.विलास गोबाडे, जगदीश जोगदंड,दौलत भोसले,

 

नागेश नागठाणे,कार्यक्रमाचे संयोजन नितीन उर्फ बंटी कदम आदीं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

यावेळी रावणाची प्रतिमा साकारणा-या कलाकार नंदू बोंबरोळे आकाश तसेच छायाचित्रकार रवी बिछडे, आतिश बाजीची रचनात्मक मांडणी करणारे शाकीर भाई

 

यांच्यासह दहा फुटी रावणाच्या प्रतिमा तयार करणाऱ्या बालकलाकार अनिकेत मुंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

यानंतर खा .संजय जाधव , शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम गंगाप्रसाद आणेराव यांनी मनोगतातुन सर्व जनतेला दस-याच्या शुभेच्छा दिल्या.भव्य आतिषबाजीसह 51 फुटी रावणाच्या प्रतिमेस खासदार संजय जाधव यांच्या

 

हस्ते अग्नी प्रज्वलन करण्यात आले. येथील जुना मोंढा बाजार मैदानावर कार्यक्रम पाहण्यासाठी शहर व परिसरातून हजारोच्या संख्येने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 

यामध्ये विशेषतः बालगोपाळांसह महिलावर्गांचा मोठा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रस्तावित संयोजक नितीन उर्फ बंटी कदम सूत्रसंचालन शिवप्रसाद ठाकूर तर आभार अतुल शहाणे यांनी मानले.

 

कार्यक्रम यशस्वीतेसाठीअक्षय कानबाले,सोमनाथ कदम,योगेश पबतवार ,सार्थक टाक ,अनिकेत मोरे संदीप हानवते, अशितोष(मोनु)ठाकूर ईश्वर ठाकुर,अमोल ठाकुर,

 

किशोर कदम, विठ्ठल डहाळे,,शुभम दडपे, वैभव कानबाले, सोम डहाळे, सुशील ठाकूर,राहुल गवते, सुमित दर्गु, अंजिक्य कानबाले,आकाश ठाकूर, लखन ठाकूर,भागवत कदम,

 

वैभव फुलारी,श्रीनाथ कळसे,विनायक कदम,रामा रोडगे,शेख मजिद ,बालाजी वाघ,राहुल कदम आदींनी परिश्रम घेतले.यावेळी पूर्णा पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *