संजय राऊतांनी बावनकुळेंचा मकाऊतील आणखी एक व्हिडीओ केला शेअर
Sanjay Raut shared another video of Bawankule in Macau

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मकाऊ येथील कॅसिनोमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
ज्यानंतर या फोटोत बावनकुळे हे जुगार खेळत असल्याचा दावा अनेकांनी केला होता. संजय राऊत यांचा हा दावा बावनकुळे यांनी फेटाळला होता. संजय राऊत आणि आज पुन्हा एक व्हिडीओ शेअर करत चंद्रशेखर बावनकुळे यांना डिवचलं आहे.
संजय राऊत यांनी एक ६ सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘मकाऊ की रातें.. पिक्चर अभी बाकी है..’, असं कॅप्शन संजय राऊत यांनी या पोस्टला दिलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
संजय राऊतांनी केलेल्या पोस्टनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं की, फोटोच्या आधारावर कोणाची प्रतिमा मलीन करता येत नाही.
खरंतर मी मागील ३४ वर्षांपासून राजकीय, सामाजिक, सार्वजनिक जीवनात आहे. मी भाजपा-शिवसेना युतीचंही अनेक वर्ष काम केलं आहे.
चार-चारदा आम्ही मतदारसंघात निवडून आलो आहोत. मोठ्याप्रमाणावर आम्ही संघर्ष करून, ३४ वर्षे काम करून आम्ही प्रतीमा तयार केली आहे. त्यामुळे जर कोणी असा प्रयत्न केलाही असेल, तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ.”
संजय राऊतांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांनी एक फोटो शेअर करत स्पष्टीकरण दिलं होतं. ‘मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे.
या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे’, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं.
महाराष्ट्र पेटलेला आहे…
आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत.
फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है…@BJP4Maharashtra @AmitShah @AUThackeray @Dev_Fadnavis pic.twitter.com/cfhswYn7Zx— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे. pic.twitter.com/yzqdrmFh0Y
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 20, 2023
An Evening in Macau..
मकाऊ की रातें..
पिक्चर अभी बाकी है..@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @ShivSenaUBT_ @supriya_sule pic.twitter.com/0QHRCRgWcQ— Sanjay Raut (@rautsanjay61) November 24, 2023