पाहा ;VIDEO धबधब्यावर अंघोळ करणाऱ्यांचे कपडे पोलिसच घेऊन पळाले; मग भोंगळे त्यांच्या मागे लागले
WATCH ;VIDEO The police ran away with the clothes of the bathers at the waterfall; Then Bhongle followed them
पोलिसांनीच पर्यटकांचे कपडे घेऊन पळ काढल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कै झाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
लोकांनी पोलिसांनी घालून दिलेले नियम पाळावेत यासाठी कर्नाटक पोलिसांनी हटके उपाय केला आहे. पोलिसांच्या सूचनांचं पालन न करता पावसाळ्यामध्ये स्वत:चा जीव धोक्यात टाकून धबधब्यांखाली स्थानासाठी गेलेल्या
पर्यटकांना पोलिसांनी धडा शिकवला आहे. पर्यटक धबधब्याखाली अंघोळ करत असानाच अचानक तिथे पोलीस आले. सामान्यपणे पोलीस पर्यंटकांना धबधब्यातून बाहेर काढून समज देतात.
मात्र इथे उलटं घडलं. पोलीस आले आणि त्यांनी पर्यंटकांना काहीही बोलण्याऐवजी नदीच्या काठावर असलेले त्यांचे कपडे घेतले आणि निघून जाऊ लागले.
यामुळे पर्यटकही संभ्रमात पडले. हा सारा प्रकार मुद्दीगीरी येथील चरमाडी धबधब्याजवळ घडला आहे. राज्य सरकारने पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाहचा अंदाज येत नसल्याचा संदर्भ देत धबधब्यांखाली अंघोळ करण्यावर बंदी घातली आहे.
राज्य सरकारने घातलेल्या बंदीचे आदेश झुगारुन काही पर्यटक धबधब्याखाली स्थानासाठी गेले. अंतर्वस्रांवर असलेल्या या पर्यटकांना पोलीस कपडे घेऊन जाऊ लागले असता
तसेच बाहेर पडून पोलिसांचा पाठलाग करावा लागाला. हे पर्यटक कपडे घेऊन जाणाऱ्या चिकमंगळुरु पोलिसांकडे कपडे परत करण्याची विनंती करु लागले.
मात्र पोलीस त्यांच्या गाडीमध्ये हे कपडे ठेऊन निघून जाण्याच्या तयारीत असताना पर्यटकांनी माफी मागत कपडे परत करण्याची विनंती केली. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पोलिसांनी या पर्यटकांकडून त्यांची चूक कबूल करुन घेतल्यानंतर पुन्हा कधीही असं करणार नाही असं वदवून घेतल्यानंतर कपडे परत केले.
अनेकांनी पोलिसांच्या या अनोख्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. कर्नाटकच्या दक्षिणेकडील अनेक भागांमध्ये 14 आणि 15 जुलै रोजी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
???? Karnataka Police take away clothes of tourists who defy the ban sign and enter the waterfall at Chikkamagaluru.
(????-@AmitSUpadhye) pic.twitter.com/NdgOMZsPm7
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) July 13, 2024