बुद्ध विहार पूर्णा येथे अश्विन पौर्णिमेनिमित्त , संघदान, धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन
On the occasion of Ashwin Poornima, Sanghdan, Dhammadeshna and felicitation ceremony organized at 2nd Vihar Purna.
अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्यबदंत डॉ. उपगुप्त महाथेरो पूज्य भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक 17 ऑक्टोबर 2024 या दिवशी अश्विन पौर्णिमेनिमित्त वर्षावास समारोप संघदान सोहळा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी साडेपाच वाजता बुद्ध विहारांमध्ये परित्राण पाठ पूजनीय भिकू संघाच्या उपस्थितीमध्ये संपन्न होईल. पूर्णा शहरातील बुद्ध विहाराचे प्रमुख
व जागतिक कीर्तीचे बौद्ध भिकू भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या वर्षावास समारोपाचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
असून सकाळी 11 ते दुपारी साडेबारा यादरम्यान भिक्खू संघासह बौद्ध उपासक व उपासिकांना भोजन . मुख्य कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता बुद्ध विहाराच्या प्रांगणात त होणार असून
यावेळी सामूहिक बुद्ध वंदना अष्ट परीस्कार संघदान मान्यवरांचा स्वागत समारंभ पूजनीय भिकू संघाची धम्मदेशना याप्रसंगी होणार आहे.
भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मुख्य धम्मदेशना देण्यासाठी भदंत शरणानंद महाथेरो भदंत
प्राचार्य डॉ. खेमो धम्मो भदंत संघपाल थेरो भदंत बोधी धम्मा बोधिधम्मा भदंत सुमेध भदंत पयावंश भंते संघरतन भंते पैयातीस उपस्थित राहणार आहेत
प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुंबई मंत्रालयातील आरोग्य विभागाचे सचिव विकास कदम नांदेड येथील फिनिक्स हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अनंत सूर्यवंशी
नांदेड येथील जिल्हा कोषागार अधिकारी ज्योतीताई बगाटे सहाय्यक लेखाधिकारी के एन इंगोले भारतीय स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर बीजी सोनकांबळे आदी उपस्थित राहणार आहेत
या वर्षावास कार्यक्रमात उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप ढगे यांच्यातर्फे सर्वांना भोजनदान देण्यात येणारे राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद कनकुटे
यांच्यातर्फे बुद्ध विहारास एसी दान तसेच करण्यात येणार आहे सदरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक
व बुद्ध विहार समिती तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व मुख्य संयोजक भंतेपया वंश विहार समितीचे सचिव एडवोकेट महेंद्र गायकवाड यांनी केले आहे