पंकजा मुंडेंकडे विविध बँकेत ठेवी, शेअर्स,सोने, चांदी, अशी किती आहे संपत्ती ?
How much wealth does Pankaja Munde have in various bank deposits, shares, gold, silver?
यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपच्या वतीनं बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. परंतु त्यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोसवणे विजयी झाले. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे.
पंकजा मुंडे यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा समोर आला आहे.
पंकजा मुंडे यांच्या नावे विविध बँक खात्यात एकून 91 लाख 23 हजार 861 रुपयांच्या ठेवी आहेत. तर विविध शेअर आणि म्यूचलफंडमधील एकूण सपंत्ती 1 कोटी 28 लाख 75 हजार 694 रुपये इतकी आहे.
त्यांच्या नावावर एकही वाहन नाहीये. पंकजा मुंडे यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत – 96 लाख 73 हजार 490 रुपये इतकी आहे तर जंगम मालमत्ता 6 कोटी 8 लाख 15 हजार 709 रुपये इतकी आहे.
पंकजा मुंडे यांच्या नावे एकूण 2 कोटी 74 लाख 89 हजार 518 रुपयांचं कर्ज आहे. तर पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावावर 2 कोटी 50 लाख 32 हजार 427 रुपयांचं बँक कर्ज आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडे 2 लाख 84 हजार 530 रुपये इतकी रोख रक्कम आहे. सोने 450 ग्राम किंमत 32 लाख 85 हजार, चांदी चार किलो किंमत3 लाख 28 हजार व इतर दागिने किंमत 2 लाख 30 हजार रुपये.
तर पंकजा मुंडे यांच्या पतीकडे सोने 200 ग्रॅम किंमत तेरा लाख, चांदी 2 किलो किंमत 1 लाख 38 हजार रुपये तर इतर दागिने किंमत दोन लाख 15 हजार रुपये एवढी संपत्ती आहे.