शालेय बॅडमिंटन स्पर्धेत विद्या प्रसारन सभेचे हायस्कूल प्रथम
Vidya Prasaran Sabha's High School stands first in School Badminton Tournament

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णा तालुका क्रीडा संकुलन येथे घेण्यात आलेल्या
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विद्या प्रसारन सभेचे हायस्कूल मधील 17 वर्षातील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मिळाला असून विजय संघाची जिल्हास्तरीय बॅडमिंटन विजय
संघाचे संस्था अध्यक्ष डॉ.दत्तात्रेयजी वाघमारे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सचिव विजयकुमार रुद्रवार, उपाध्यक्ष भीमरावजी कदम,
श्रीनिवासजी काबरा, उत्तमरावजी कदम, साहेबरावजी कदम, मुख्याध्यापक देविदास उमाटे व शिवदर्शन हिंगणे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजय संघातील खेळाडू पुढील प्रमाणे :
1) सार्थक लक्ष्मीकांत कदम
2) गंगाप्रसाद लक्ष्मण भिसे
3) सर्वेश विवेक कोंडेकर
विजय संघास क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे व सज्जन जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.