पवार महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनाचा बी.प्लस दर्जा

B. Plus grade of NACC assessment to Pawar College

 

पूर्णा-शेख तौफिक

 

 

पूर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयास नुकतीच बेंगलोर येथील समितीने दिनांक ०४ व ०५ सप्टेंबर २०२४ रोजी भेट दिली असता त्यांनी केलेल्या मूल्यांकनामध्ये महाविद्यालयास तिसऱ्या वेळेस बी.प्लस दर्जा प्राप्त झाला आहे.

 

नॅक मूल्यांकनासाठी आलेल्या समितीमध्ये समितीचे अध्यक्ष आसाम येथील आसाम विद्यापीठ,शिलचरचे माजी कुलगुरू डॉ .देवाशिष भट्टाचार्य, समन्वयक कर्नाटक येथील केंद्रीय विद्यापीठ,

 

गुलबर्गाचे कुलसचिव डॉ. रुद्रगौडा बिरादार आणि सदस्य जम्मू काश्मीर येथील शासकीय महाविद्यालय,श्रीनगरचे प्राचार्य डॉ. नाझीर अहमद सिमनानी

 

या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता कक्ष, ग्रंथालय, गृहविज्ञान विभाग, क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग ,भाषा प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा व राष्ट्रीय सेवा योजना

 

या विभागास भेटी देऊन महाविद्यालयाची तपासणी केल्यानंतर महाविद्यालयास २.७४ हे गुणांकन प्राप्त झाले असून बी.प्लस दर्जा मिळाला आहे.

 

स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या पहिल्या मूल्यांकनामध्ये २.०५, दुसऱ्या नॅक मूल्यांकनामध्ये २.५० असे गुणांकन प्राप्त झाले होते .आता तिसऱ्या वेळेस नॅक मूल्यांकनामध्ये २.७४ गुणांकन मिळाले असून बी प्लस दर्जा मिळाला आहे.

 

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, अध्यक्ष गुलाबराव कदम, कोषाध्यक्ष डॉ.सुनिता काळे (पवार),उपाध्यक्ष इंजिनिअर अविनाश कोठाळे व इतर संचालक मंडळ

 

यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी, माजी विद्यार्थी संघटना, आजी माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेऊन समन्वय साधत महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी जे योगदान दिले आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.

 

या यशाबद्दल प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. भीमराव मानकरे, विविध समित्याचे समन्वयक ,

 

सदस्य व महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *