पूर्णा येथे ५० ठिकाणी सार्वजनिक दुर्गा महोत्सवाची स्थापना

Establishment of public Durga festival at 50 places in Purna

 

 

पूर्णा/तौफिक शेख/९९०४४३०२४

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पूर्णा शहर व तालुक्यात घरोघरी घटस्थापना करण्यात आली असून, पूर्णा पोलीस ठाणे अंतर्गत शहरात व ग्रामीण भागात सुमारे ५० ठिकाणी

 

सार्वजनिक नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. नवरात्र उत्सव शांतते संपन्न व्हावा यासाठी पूर्णा पोलिसांकडूनबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

दरवर्षी अश्विन शुक्ल पक्ष एक रोजी घटस्थापने पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते नऊ दिवस चालणाऱ्या वस्तू देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते हिंदू धर्मात

 

अश्विन नवरात्राला विशेष महत्त्व असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून तसेच देवीच्या विविध रूपाची पूजा करून नवरात्रीचा सण मोठ्या उत्साह साजरा केला जातो.

 

पूर्णा पोलिस ठाण्या हद्दीत एरंडेश्वर, कातनेश्वर,माटेगाव नावकी ,आहेरवाडी, सुहागन, निळा नांदगाव, सुकी, खुजडा, पिंपळगाव बाळापुर ,

 

संदलापूर सह ३० गावांमध्ये ३० ते ३५ ठिकाणी भक्तांनी सार्वजनिक पद्धतीने दुर्गा महोत्सवाची स्थापना करण्यात केली आहे.

 

शहरातील आनंदनगर गवळी गल्ली महादेव मंदिर दत्त मंदिर आदर्श कॉलनी पंचशील नगर कोळीवाडा अंबा नगरी शास्त्रीनगर अहमदनगर

 

आधी भागात सार्वजनिक नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला आहे. तर शहरातील भवानी मंदिर, अंबिका मंदिर, कुंभार गल्ली, डोली गल्ली, शास्त्रीनगर येथील

 

मंदिरात घटस्थापना करण्यात आल्यास इथे देखील उत्सवाला प्रारंभ झाला आहे. पूर्णा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विलास गोबाडे यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *