पवार महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन संपन्न

Inauguration of Skill Development Center in Pawar College

 

पूर्णा – शेख तौफिक

 

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे संवादासाठी
येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाची निवड केली असून

 

दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी या केंद्राचे उदघाटन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री सिताराम मांझी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

 

तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर पवार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सुरेखा भोसले,

 

परभणी कौशल्य विकास विभागाचे अधिकारी प्रवीण रुद्रकंठवार, अधिसभा सदस्य तथा समन्वयक डॉ.विजय भोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

विश्वकर्मा योजना व चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या विविध योजनांची माहिती यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आली.

 

बारा बलुतेदार आणि आठरा अलुतेदार या वर्गातील वेगवेगळ्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

दूरदृश्य प्रणालीद्वारे उदघाटन समारंभास महाविद्यालयांमध्ये जवळपास २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या दूरदृश्य प्रणालीद्वारे उदघाटन समारंभास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

 

परभणी जिल्हा कौशल्य विकास विभागाचे अधिकारी प्रवीण रुद्रकंठवार यांनी यावेळी योजने संदर्भाने सविस्तर असे मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमासाठी समन्वयक डॉ.विजय भोपाळे, तंत्र सहाय्यक प्रा.डॉ.अशोक कोलंबीकर, करिअर कट्याचे तालुका समन्वयक प्रा.डॉ.संजय कसाब,

 

क्रीडा संचालक डॉ भारत चापके,परभणी जिल्ह्याचे कौशल्य विकास विभागाचे प्रवीण रुद्रकंठवार,कनिष्ठ महाविद्यालयचे पर्यवेक्षक प्रा. दत्ता पवार,

 

कनिष्ठ लिपिक दत्ता कदम, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

 

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *