नवमतदारांनी नोंदणी करून लोकशाही मजबूत करावी : उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे

New voters should register and strengthen democracy: Deputy Collector Dattu Shewale

 

 

 

परभणी येथील शारदा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती अभियानांतर्गत युवा संवाद कार्यक्रम घेण्यात आला.

 

यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. वैशाली देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे,

 

नायब तहसीलदार सौ. वडवळकर, नायब तहसीलदार पखवाणे, सौ. टाक व संवादक प्रविण वायकोस यांची उपस्थिती होती.

 

यावेळी बोलतांना उपजिल्हाधिकारी यांनी नवीन मतदार यादीत नाव येण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज करावा हे सांगून नवमतदारानी

 

नोंदणी करून लोकशाही आणखीन मजबूत करावी असे आवाहन केले. तत्पूर्वी संवादक प्रविण वायकोस यांनी एकपात्री प्रयोगातून नवमतदारांना जागृत केले.

 

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन खडके यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. हनुमंत शेवाळे यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला

 

प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलौद्दिन ,नोडल अधिकारी प्रा. डॉ. सुरेश खिस्ते,

 

डॉ. अविनाश पांचाळ, डॉ. सौ. उज्वला जगताप, डॉ. नवनाथ सिंगापूरे, सुरेश जयपूरकर, राजाराम मूत्रटकर, राजकुमार नागुला, सुनंदा राजगुरू, तनुजा रासवे, जावेद शेख, नसीरुद्दीन काझी यांनी प्रयत्न केले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *