७० लाख मोबाईल नंबर बंद, सरकारने का उचलले मोठे पाऊल
7 million mobile numbers closed, why the government took a big step
देशात डिजीटल आणि ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दररोज सायबर गुन्हेगार फोन कॉल अथवा मेसेजिंगच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत आहे.
आर्थिक सेवा सचिव विवेक जोशी यांनी मंगळवारी सांगितले की सरकारने डिजीटल फसवणुकीवर बंदी घालण्याच्या दिशेने पाऊल उचलताना संशयित देवाण-घेवाणीमध्ये सामील ७० लाख मोबाईल नंबर निलंबित केले आहेत.
आर्थिक सायबर सुरक्षा आणि वाढत्या डिजीटल पेमेंटच्या फसवणुकीसंदर्भातील मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर ते म्हणाले बँकांना या संबंधित व्यवस्था
तसेच प्रक्रिया अधिक मजबूत करण्यास सांगितले आहे. याबाबतच अशा अनेक बैठकी होतील आणि पुढील बैठक जानेवारीमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक सेवा सचिवांनी याबाबत बोलाताना सांगितले की राज्यांना याबाबतच्या मुद्द्यांवर लक्ष घालण्यास सांगितले तसेच आकडा सुनिश्चित करण्यास सांगितला आहे.
या बैठकीत व्यापाऱ्यांच्या केवायसी मानकीकरणाबाबतही चर्चा झाली. आर्थिक सेवा सचिव यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या बैठकीत सायबर फसवणूक रोखण्यासाठी विविध एजन्सीमध्ये चांगला समन्वय कसा साधला जाईल याबाबतही चर्चा करण्यात आली.
जोशी म्हणाले, भोळ्याभाबड्या लोकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी समाजात सायबर फसवणुकीबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.
या बैठकीत राजस्व विभाग, दूरसंचार विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिक मंत्रालय, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता.