पोलीस होण्यासाठी आला आणि जेलमध्ये गेला

Became a policeman and went to jail

 

 

 

 

 

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान काही उमेदवारांकडून गैरप्रकार समोर येतात. जालना जिल्ह्यातही

 

 

 

असाच एक प्रकार उघडकीस आला. कोल्हापूर येथील तरुणाला कागदपत्र सादर करताना प्रमाणपत्रावरील खडाखोड महागात पडली. त्याला थेट जेलची हवा खावी लागली.

 

 

 

जालन्यात 102 पोलीस शिपाई आणि 23 पोलीस चालक अशा एकूण 125 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. सध्या या भरतीची मैदानी चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.

 

 

 

 

याच भरतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सोमवार पेठ इथला अविनाश अशोक माने हा तरुण आला होता. त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली असता,

 

 

 

 

प्रमाणपत्र प्रदान केल्याची तारीख 20 जून 2024 अशी होती. मात्र त्यानं शहरातील आई मल्टी सर्व्हिसेसच्या चालकाकडून कॉम्प्युटरवर 15 एप्रिल 2024 अशी बनावट कागदपत्र तयार केली. हा प्रकार उघडकीस येताच या तरुणावर कडक कारवाई करण्यात आली.

 

 

शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात उमेदवार अविनाश माने आणि आई मल्टी सर्व्हिसेसच्या चालकाविरोधात

 

 

 

भादवी कलम 420, 465 आणि 468 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी पोलीस भरतीसाठी आलेल्या या तरुणाला एका चुकीमुळे आता थेट जेलची हवा खावी लागलीये.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *