बच्चू कडू यांनी केली प्राध्यापक,आमदाराच्या पगारी कमी करण्याची मागणी
Bachu Kadu demanded to reduce the salaries of professors and MLAs
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी थेट राज्य सरकारलाच चॅलेंज दिलं आहे. बच्चू कडू हे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी रोखठोकपणे भूमिका मांडली.
“भाजप आणि काँग्रेसमध्ये धमक असेल तर प्राध्यापक आणि आमदाराच्या पगारी कमी कराव्यात. आमचे 25 सुद्धा आमदार आले तर आम्ही पहिले ते काम करू. गुंडागर्दी करायला कोणाच्या बापाचं राज्य नाही”,
असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू हे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी राज्यपालांच्या निवासस्थानावरुनही निशाणा साधला. “आमचा महाराष्ट्राचा राज्यपाल हा 40 एकरावर राहतो.
त्याचे हात पाय किती लांब आहे हे पहावे लागेल. कष्टकऱ्यांसाठी कोणती योजना आहे का? घरी बसून खा अन् घ्या 1500 रुपये.
आता आम्ही सांगणार लाडका भाऊ अन् लाडकी बहीण नाही. लाडका आमदार आणि लाडका मुख्यमंत्री, जो सर्वसामान्यांचा विचार करेल”, अशी जोरदार टीका बच्चू कडू यांनी केली.
“आमचे 25 जरी आमदार निवडून आले तर आम्ही प्राध्यापक आणि आमदाराच्या पगारी कमी करण्याचं पहिलं काम करू. भाजप आणि काँग्रेसमध्ये धमक असेल तर त्यांनी ती धमक दाखवावी.
प्राध्यापकाला अडीच लाख, आमदारांना तीन लाख एवढा पगार कशासाठी? एका पंक्तीमध्ये काहीच नाही तर दुसऱ्या पंक्तीमध्ये बळच टाकताय. कुणाच्या बापाचं राज्य आहे का? आम्ही मतं देतोय. त्यामुळे ही गुंडागर्दी चालणार नाही”, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.
“आमचा महाराष्ट्राचा राज्यपाल हा 40 एकरावर राहतो. त्याचे पाय आणि हात किती लांब आहे हे पहावे लागेल. त्यांच्या घराच्या चारही बाजूने समुद्र दिसतो.
आम्हाला इथे चारही बाजूने पाहील तर मौतच दिसते. घ्या त्या राजपालाला पदरात घालून तर एकीकडे कष्टकऱ्यांसाठी कोणती योजना आहे का? तुम्ही आठ दिवस काम केलं.
कोणती योजना आहे? घरी बसून खा, घ्या हे 1500 रुपये. आता आम्ही सांगणार लाडका भाऊ अन् लाडकी बहीण नाही. लाडका आमदार
आणि लाडका मुख्यमंत्री पाहीजे आम्हाला, जो सामान्य माणसाचा विचार करेल”, असा हल्लाबोल आमदार बच्चू कडू यांनी केला.
“आम्ही तिसऱ्या आघाडीच्या फंद्यात पडणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांचं मत घेऊन निर्णय घेऊ, अशी देखील भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे.
“आम्ही तिसऱ्या आघाडीच्या फंद्यात पडणार नाहीत. संभाजीनगर येथे नऊ तारखेला एक निवेदन आमचे जाहीर होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती यांचं मत घेऊन आम्ही निर्णय घेणार”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.