महिलेच्या खूनप्रकारणात आरोपींना अटक

Accused arrested in murder of woman

 

 

 

 

१४/०९/२०२४ रोजी विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या पडीक जागेत काटेरी झुडूपांमध्ये, पूर्णा येथे एका ४५-५० वयोगटातील अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले होते.

 

तिच्या तोंडावर, डोक्यात गंभीर जखमांवरून सदर महीलेचा खून झाला असल्याचे दिसून आल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांच्या

 

 

मार्गदर्शनकरून स्टाफने घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सोबत फॉरंन्सीक टिमला रवाना केली होती.

 

मयत महीलेचा फोटो व्हॉटसअॅपवर व्हायरल करून यातील मयत महीला ही रमाबाई भ्र. अनिल चिकाटे वय ५० वर्षे रा. विजयनगर पूर्णा हि ओळखदाराकडून असल्याचे निष्पन्न केले.

 

सदर प्रकरणी यातील मयत महीलेचा मूलगा नामे श्याम अनिल चिकाटे वय २९ वर्षे व्यवसायः- मजूरी रा. सिध्दार्थनगर पूर्णा याचे फिर्यादयसन पो. स्टे. पूर्णा येथे गूरनं ३११/२४ कलम १०३(१), २३८ भान्यासं प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

 

१) माणिक रामचंद्र मूळे वय ४० वर्षे रा. मूळेगल्ली शिवाजीनगर पूर्णा २) आवेज कुरेशी युसुफ कुरेशी वय ३० वर्षे ३) शादुल कुरेशी युसुफ कुरेशी वय २६ वर्षे दोन्ही रा. कुरेशी मोहल्ला, पुर्णा यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

सदर तिन्ही आरोपींना स्थागूशा पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांना पूढील कायदेशीर कार्यवाहीस्तय पो. स्टे. पूर्णा यांच्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी भापोसे यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस

 

अधिक्षक श्री यशवंत काळे यांचे नेतृत्वात श्री जीवन बेनीवाल भापोसे उपविपोअ जिंतूर चार्ज पूर्णा, श्री अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक स्थागूशा परभणी, श्री विलास गोबाडे पोलीस निरीक्षक पूर्णा,

 

श्री पी. डी. भारती सपोनि स्थागूशा परभणी, श्री रामकिशन नांदगावकर सपोनि, पोउपनि चंदनसिंह परीहार, पोउपनि प्रकाश इंगोले, पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे,

 

सचिन भवरगे, हनुमान ढगे, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड, साहेब मानेबोईनवाड, अजय माळकर, संदीप चौरे, मंगेश जूकटे, रमाकांत तोटेवाड,

 

गणेश कौटकर, प्रशांत लटपटे, स्वप्नील पोतदार यांनी पार पाडली आहे. यातील अनोळखी मयत महीलेच्या खूनाची उकल सत्वरतेने केल्याने मा. पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *