पवार महाविद्यालयात मुक्तीसंग्रामदिन व विद्यापीठ वर्धापन दिन साजरा
Liberation Day and University Anniversary celebrated in Pawar College
पूर्णा -शेख तौफिक
येथील सूर्यभानजी पवार महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीदिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठवाडा मुक्तीदिना निमित्त राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांच्या हस्ते करण्यात आले
तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग प्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सुरेखा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.भीमराव मानकरे, महाविद्यालयातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.विजय भोपाळे,
तत्वज्ञान अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. प्रभाकर किर्तनकार, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय कसाब आदी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत संगीत विभागाच्या प्रा. सुजाता घन यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख डॉ. भारत चापके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.