ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या ठेवीदारांचा रास्ता रोको

Block the way for depositors of Gnanaradha Multistate

 

 

 

 

बीडमध्ये मल्टीस्टेट बँकांचे ठेवीदार आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत. मल्टीस्टेट बँकांमध्ये अडकलेले ठेवीदारांची रोख रक्कम परत मिळावी

 

 

 

यासाठी ठेवीदारांनी एकत्र येत राष्ट्रीय महामार्ग अडवला आहे. तसेच ठेवीदारांनी या बँकांच्या संचालकांवर कडक कारवाई करावी अशी यावेळी मागणी केली आहे.

 

 

 

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील मल्टिस्टेट बँका डबघाईला आल्या असून अनेक बँकांना कुलूप लागले आहे. परिणामी ठेवीदारांचे पैसे या बँकांमध्ये अडकून पडले आहेत.

 

 

 

 

हे पैसे ठेवीदारांना परत मिळावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन उबाळे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागील पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत.

 

 

 

 

तरीही अद्याप आपले पैसे मिळाले नसल्याने सर्व ठेवीदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि एकत्र येत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रोखला आहे.

 

 

 

बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, लक्ष्मी माता अर्बन आणि मराठवाडा अर्बन या बँकेत हजारो ठेवीदारांनी आपल्या ठेवी रोख स्वरूपात ठेवल्या होत्या.

 

 

परंतु गेल्या सहा महिन्यांपासून बँकांचे व्यवहार कोलमडून पडले, बँका डबघाईला गेल्या आणि अखेर त्यांना कुलूप देखील लागले. यामध्ये बँकेसोबतच ठेवीदारांनाही आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

 

 

 

 

सर्व मल्टीस्टेट बँकांना कुलूप लागल्याने कोट्यावधी रुपयांच्या ठेवी या बँकांमध्ये अडकून पडल्या आहेत. याच ठेवी ठेवीदारांना परत मिळाव्यात यासाठी प्रशासनासह शासनाकडे देखील पाठपुरावा केला जात आहे. परंतु अद्याप ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत.

 

 

 

आपल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली आणि ठेवीदारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.

 

 

 

 

तसेच मल्टिस्टेट बँकांचे सर्व संचालक आणि अध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी देखील केली आहे. तर पाच दिवसांपासून उपोषण सुरु असून

 

 

 

शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. ठेवीदारांचे पैसे मिळाले नाहीतर जेलभरो आंदोलन करु, मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर जाऊन ठिय्या देऊ, असा संतप्त ठेवीदारांनी सरकारला इशाराच दिला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *