MBBS परीक्षेत अफरा समिन अहेमद नदीम हिचे घवघवीत यश
Afra Samin Ahmed Nadeem's impressive success in MBBS exam

अफरा समिन अहेमद नदीम या विद्यार्थिनीने एमबीबीएस तृतीय वर्षात 64 टक्के पेक्षा जास्त मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे .
याबाबत माहिती अशी की वैद्यकिय अधिकारी ग्रामीण रुग्णालय ,पूर्णा येथे कार्यरत असलेले डॉ.अहमद नदीम यांची मुलगी आणि यशवंत कॉलेज ऑफ आयटी चे कार्यालयीन अधीक्षक अब्दुल रहीम यांची नात
अफरा समिन हिचा एमबीबीएस तृतीय वर्षाच्या परीक्षेत निकाल नुकताच जाहीर झाला , या परीक्षेत तिने 64.02% मार्क घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या जालना जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या अफरा समिन हिने भरघोस यश संपादन करून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली आहे .
तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल तिचे कुटुंबीय,नातेवाईक,मित्र-परिवार आणि समाजाच्या सर्व स्तरातून होत आहे ,भविष्यात एक चांगले आरोग्य अधिकारी होऊन समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा मनोदय अफरा समीन हिने व्यक्त केला आहे