महाविकास आघाडीने प्रकाशित केला ‘गद्दारांचा पंचनामा’

Mahavikas Aghadi published 'Traitors' Panchnama'

 

 

 

राज्यामध्ये विधानसभा निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असतानाच आज (13 ऑक्टोबर) महाविकास आघाडीकडून महायुती सरकारविरोधात गद्दारांचा पंचनामा प्रकाशित करण्यात आला.

 

महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया धुळे, संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर घणाघाती प्रहार केला.

 

 

नाना पटोले म्हणाले की, गद्दारांचा पंचनामा आम्ही केला आहे. अडीच वर्षात यांनी कसं सरकार चालवलं याचा पंचनामा यात करण्यात आला आहे.

 

ज्या लोकांनी शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तिचं लोकं आज सत्तेत आहेत. त्याच लोकांच्या भ्रष्टाचारामुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला.

 

देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही या घटनेची माफी मागितली नाही. काल तर बाबा सिद्धकी यांची हत्या करण्यात आली. सत्ता पक्षातील नेते देखील सुरक्षित नाहीत. स्वतःच राजकारण कसं करायचं हेच यांच्या डोक्यात आहे.

 

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की हत्या प्रकरणाची अद्याप योग्य माहिती आमच्याकडे आलेली नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे तपासावर परिणाम होईल,

 

असं काही बोलणार नसल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील जनता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचे ते म्हणाले. लोकसभेच्या निकाल काहींनी मान्य केला नाही, तेव्हा लोकांनी बदल हवा आहे हे सांगितलं.

 

उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारांचा पंचनाम आम्ही केला आहे. महाराष्ट्राबरोबर यांनी गद्दारी केली आहे. येत्या दीड महिन्यात हे सरकार घालवायला हवं. मुंबई हे असं शहर आहे तिथं २ पोलीस कमिशनर आहेत.

 

जे जे लाडके आहेत त्यांना कमिशनर करा. पाच कमिशनर करा. माझं स्पष्ट म्हणणं आहे की, जी गद्दाराना सुरक्षा देण्यात आली आहे. ती काढा आणि लोकांसाठी वापरा.

 

ही जबाबदारी गृहमंत्री यांची आहे. मोठं मोठे सध्या होर्डिंग लावतात. देवेंद्रजी म्हणतात उद्या गाडी खाली कुत्र आल तरी म्हणाल गृहमंत्री जबाबदार आहे. आता यावर त्यांचं काय उत्तर आहे. सध्या केवळ कलाकार सोबत घेऊन मोठ्या जाहिराती सरकार करत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *