23 तारखेलाच महाविकास आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार
The Mahavikas Aghadi will claim the establishment of power on 23rd

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. काल मतदान पार पडलं आहे. शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे. या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.
23 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील. एक्झिट पोलवर कुणीही विश्वास ठरवू नये.
आतापर्यंत कोणते एक्झिट पोल सत्य झाले हा तपासाचा भाग आहे. प्रचंड पैसे त्यांनी वाटले आहेत. तरी सुध्दा ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. अभिमानावर लढलेली आहे. पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता लोकांनी मतदान केलं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
आजच गौतम अदानींवर वॉरंट निघालं आहे. महाराष्ट्र अदाणीला विकायला निघालेला आहे. ट्रंप सरकारने अदाणी विरोधात वॉरंट काढल आहे. धारावी, एअरपोर्ट अनेक टेंडर आहेत.
त्यातही गौतम अदाणीने, संगनमत करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सुध्दा ट्रंप प्रशासनाप्रमाणे कारवाई करू म्हणून आम्हाला पाडण्याचा प्रयत्न झाला, असं संजय राऊत म्हणालेत.









