कार पुलावरून खाली कोसळून ५ जणांचा जागीच मृत्यू;नांदेडची घटना
5 people died on the spot after the car fell off the bridge

नांदेड जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भोकर-उमरी रस्त्यावरील मोघाळीजवळील कारचा भीषण अपघात झाला आहे.
भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून खाली कोसळली. या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
रात्रीच्या सुमारास कार नाल्यात पडली पाणी असल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडताना अडथळा निर्माण झाला. त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने
आसपास शेतात असलेले काही लोक मदतीसाठी आले. त्यांनी मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. त्याचबरोबर अपघाताची माहिती भोकर पोलिसांना दिली.
या भीषण अपघातात सविता श्याम भालेराव (वय २५), प्रीती परमेश्वर भालेराव (वय ८) सुशील मारोती गायकवाड (वय ९) रेखाबाई परमेश्वर भालेराव(वय ३०),
अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव(वय २८) यांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती भोकर तालुक्यातील रेणापूर गावातील रहिवासी आहेत.
अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त भालेराव आणि गायकवाड कुटुंब मजुरीसाठी तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे राहत होते .









