लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला सोपे नाही ;पहा काय म्हणते ओपिनियन पोल

It will not be easy for BJP in the Lok Sabha elections in the state; see what the opinion polls say

 

 

 

 

देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्या बैठका सुरु आहेत.

 

निवडणुकीची घोषणा होण्यास अजूनही अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर सी वोटर या संस्थेनं एबीपी समुहासाठी केलेला सर्व्हे समोर आला आहे.

 

 

या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांवर कोण बाजी मारणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत.

 

 

यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडी चा सामना भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होणार आहे.

 

 

एबीपी सी वोटरच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळू शकतात. मविआला २६ ते २८ तर महायुतीला १९-२१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना ०-२ जागा मिळू शकतात.

 

 

सर्व्हेतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात मविआच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढणार आहे.

 

मविआला लोकसभेला ४१ टक्के मतं मिळू शकतात. तर, महायुतीला ३७ टक्के मतं मिळतील. इतरांना २२ टक्के मतं मिळू शकतात.

 

 

महाराष्ट्राचा ओपिनियन पोल खालील प्रमाणे

मतांची टक्केवारी

महाविकास आघाडी : ४१ टक्के
महायुती : ३७ टक्के

 

 

 

कुणाला किती जागा मिळणार?
महायुती : १९ ते २१
मविआ : २६ ते २८
इतर : ० ते २

 

 

 

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयामुळं आत्मविश्वास निर्माण झालेली

 

भाजप आणि महायुती आणि त्यांच्या समोरील महाविकास आघाडी यांच्यामध्ये कुणाच्या बाजूनं मताचा कौल मतदार देणार हे आगामी काळातील

 

 

प्रचार आणि राजकीय घडामोडींवर दिसून येणार आहे. महाराष्ट्रातील जनता कुणाला कौल देणार हे प्रत्यक्ष निवडणुकीनंतर समोर येईल.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *