CRIME NEWS;पोलीस उपनिरीक्षकाला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा ;पाहा काय आहे प्रकरण

Court sentences police sub-inspector to life imprisonment; see what the case is

 

 

 

हत्येप्रकरणात तब्बल आठ वर्षांनी गुन्हेगार फौजदाराला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे,दौंडमधील पोलिस उपनिरीक्षकाला तिहेरी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

2018 मध्येशस्त्रागारातून पिस्तुल आणि मॅगझीन चोरून तिघांची हत्या करण्यात आली होती. अखेर या प्रकरणात 8 वर्षांनी निकाल लागला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊयात.

 

दौंडमध्ये कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यानेच कायदा हातात घेत शस्त्रागारातून पिस्तुल आणि मॅगझीन चोरून तिघांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा ;….Agriculture News :”या” शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार घेऊ शकते ताब्यात ,जाणून घ्या

संजय बळीराम शिंदे असं शिक्षा ठोकवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपी संजय शिंदे हा विशेष राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत होता.

 

2018 मध्ये दौंड मधील नगरमोरी चौक आणि जिजामाता नगर परिसरात गोपाळ शिंदे, परशुराम पवार आणि अनिल जाधव या तिघांची हत्या या आरोपीने केली होती.

हे सुद्धा वाचा ;….maharashtra;corona breaking कोरोनाची पुन्हा लाट ;आता मास्क सक्ती होणार ?

दौंड तालुक्यात घडलेल्या या तिहेरी हत्याकांडात न्यायालयाने कठोर निर्णय देत, तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. विशेष म्हणजे, या दंडातील ८० टक्के रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

केवळ उसनवारीच्या वादातून आणि किरकोळ भांडणाच्या पार्श्वभूमीतून या तिघांचा खून करण्यात आला होता.घटनास्थळावरून मिळालेल्या पुंगळ्या, मृतांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या

हे सुद्धा वाचा ;….राज्याला रेड अलर्ट; अवकाळीचा कहर; ‘मान्सून’ कधी ?

आणि आरोपीकडून जप्त करण्यात आलेली जिवंत काडतुसे या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. या प्रकरणातील एक विशेष बाब म्हणजे,

 

अमेरिकेतील एका बॅलेस्टीक तज्ज्ञाची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदवण्यात आली. भारतात सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरू झालेली ही साक्ष अमेरिकेत मध्यरात्री दोनच्या सुमारास झाली.

हे सुद्धा वाचा ;…. मराठवाड्यातील मंत्र्याला राऊत म्हणाले ,पचास पचास खोके आये थे. उनको ज्यादा मिला क्या !

संबंधित तज्ज्ञ त्या वेळेस कोर्टासमोर हजर राहिले. या दुर्दैवी घटनेमुळे चिमुकल्यांनी आपल्या वडिलांचे छत्र गमावले आहे. कोणाचा नऊ वर्षांचा मुलगा, तर कोणाच्या तीन मुली पित्याविना पोरक्या झाल्या आहेत.

 

आज त्यांच्या डोळ्यांसमोर एकच प्रश्न आहे कायद्याचे रक्षण करणाऱ्या व्यक्तींचे हे राक्षसी रूप आणखी किती काळ सहन करावे लागणार?

 

या प्रकरणात सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावत, कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *