काँग्रेसच्या विद्यमान आमदाराचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Current Congress MLA joins Ajit Pawar's NCP

 

 

 

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पुढील काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे.

 

अनेक नेत्यांचे दिल्ली दौरे सुरु आहेत, तर काही नेते राज्यातील विविध मतदारसंघात दौरे करत कामाचा आढावा घेत आहेत.

 

यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे. आता राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

 

 

इगतपुरीचे काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत

 

मुंबईत आमदार हिरामण खोसकर यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. दरम्यान, आमदार हिरामण खोसकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

 

“इगतपुरीचे आमदार आणि आदिवासी समाजाचे नेते हिरामण खोसकर यांनी आज राष्ट्रवादीचे विकासाभिमुख विचार स्वीकारत माझ्या आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत

 

आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार खोसकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चालवलेल्या कामांची

 

व लोकोपयोगी योजनांची ही पोचपावती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात मी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो”, असं अजित पवारांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, हिरामण खोसकर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. त्यांनी ही भेट का घेतली? यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रियाही दिली होती.

 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हिरामण खोसकर हे काँग्रेसवर नाराज असल्याचीही चर्चा होती. तसेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा होती.

 

यामध्ये आमदार हिरामण खोसकर यांचंही नाव चर्चेत आलं होतं. मात्र, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. यातच क्रॉस वोटिंग केलेल्या

 

आमदारांना काँग्रेस विधानसभा निवडणुकीत तिकीट देणार नसल्याचं बोललं जात होतं. यातच आता हिरामण खोसकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *