पुर्णा शहरात ATM उपलब्ध करून देण्याची मागणी

Demand to make ATM available in whole city

 

 

पुर्णा /शेख तौफिक /9970443024

पुर्णा शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय असुन नागरिकांनां बॅकीग व्यवहार करण्यास अडचण निर्माण होत आहे.

 

शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मागच्या दोन वर्षापासून बंद आहे, त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या खातेदारांना एटीएम पिन जनरेट करण्यासाठी नांदेड

 

किंवा परभणी येथे जावे लागते पूर्वी एक एटीएम बँकेच्या बाजूस होते परंतु मागील दोन वर्षापासून ते एटीएम तेथून हलवले हे अद्याप पूर्णेकरांना माहित नाही

 

बँकेच्या अधिकाऱ्यांना चौकशी केली असता एटीएमची सुविधा लवकरच उपलब्ध करून असे मोघम उत्तर ते देत असतात
नवीन एटीएम कार्ड धारकांना एटीएम पिन जनरेट करण्यासाठी

 

40 किलोमीटर असणाऱ्या नांदेड किंवा परभणी येथे जाऊन तेथील येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम वर पिन जनरेट करून आणावी लागते

 

याबाबत नागरिकांनी अनेक वेळा लक्ष वेळा मागणी करूनही एटीएम मात्र मागच्या दोन वर्षापासून बँकेने उपलब्ध करून दिले नाही महाराष्ट्र बँकेचे एटीएम उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पूर्णेकरांमधून होत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *