मराठवाड्यातून मुंबईसाठी दररोज धावणार वंदे भारत ट्रेन ;पहा किती असणार भाडे

Vande Bharat train will run daily from Marathwada to Mumbai; see how much the fare will be

 

 

 

 

देशभरात आपल्या वेगामुळे परिचित असलेली वंदे भारत एक्सप्रेस लवकरच मराठवाड्यातून सुद्धा धावणार आहे. मुंबई ते जालना या मार्गावर ‘वंदे भारत’ सुरू होणार असून

 

 

उद्घाटनाचा मुहूर्त देखील ठरला आहे. या ट्रेनमुळे मुंबई ते जालना, तसेच जालना ते मुंबई अंतर कमी वेळात गाठता येईल. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

 

 

मराठवाड्यातील अनेक व्यावसायिक तसेच नोकरदार कामासाठी मुंबईत येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी

 

 

 

मुंबई-जालना मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याचं सूतोवाच केलं होतं. यासाठी रेल्वे रूळाचे कामही वेगात सुरू करण्यात आलं.

 

 

दरम्यान, येत्या ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ नव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती आहे. यामध्ये अयोध्या-आनंद विहार, नवी दिल्ली-वैष्णवो देवी,

 

 

अमृतसर-नवी दिल्ली, कोईम्बतूर-बेंगलोर आणि जालना-मुंबई  वंदे भारतचा देखील समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

 

 

दरम्यान, जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान जालना येथून निघणार आहे. ही रेल्वे सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचणार आहे.

 

 

 

त्याचबरोबर मुंबई येथून ही ट्रेन दुपारी १.३० वाजता निघणार आहे. सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान वंदे भारत जालन्यात पोहचणार, अशी देखील माहिती आहे.

 

 

 

जालना येथून सुटणाऱ्या मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक इगतपुरी, ठाणे हा थांबा मिळणार असल्याची माहिती आहे.

 

 

दुसरीकडे ट्रेनच्या तिकीट दर किती राहणार? याची माहिती अद्याप समोर आली नाही. तिकीटाचा दर १००० ते १२०० रुपये इतका असू शकतो, असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *