आमदार झिशान सिद्धिकीवर काँग्रेस पक्षाकडून मोठी कारवाई
Major action by Congress party against MLA Zeeshan Siddiqui

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपुर्वी काँग्रेस सोडली. अशातच त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीवर काँग्रेस पक्षाने कारवाई करत त्यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता आमदार झिशान सिद्दीकी यांना
मुंबई युवक काँग्रेस पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष श्रेष्ठींची कारवाई केली आहे. त्यांच्याजागी अखिलेश यादव यांनी निवड करण्यात आली आहे.
सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा आमदार होते आणि त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार आणि राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते
आणि यापूर्वी दोन वेळा सलग टर्म (1992-1997)नगरसेवक म्हणूनही काम केले होते. बाबा सिद्दीकीचा मुलगा झीशान सिद्दिकी सध्या मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथून काँग्रेसचे आमदार आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर मुलगा आमदार झिशान सिद्दिकीला मुंबई युवक अध्यक्ष पदावरून हटवल्याने आता झिशान सिद्दीकी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी हे पिता-पुत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती.
मात्र, बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता झिशान देखील वेगळा निर्णय घेणार का याकडे संपुर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
काही दिवस आधी बाबा सिद्धिकी यांनी काँग्रेस पक्ष सोडला, त्यानंतर आता झिशान काय भूमिका यावर चर्चा असताना युवक अध्यक्ष पदावर हटवले आहे. त्यांच्याजागी अखिलेश यादव यांची युवक अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते.