पराभवामुळे दानवे खवळले ,म्हणाले सत्तारांचा सिल्लोड मतदारसंघ पाकिस्तान होतोय

Due to the defeat, Danve said that Sillod constituency of Sattar is becoming Pakistan

 

 

 

 

 

राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाने नेते अब्दुल सत्तार आणि भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील वाद गेल्या काही दिवसात विकोपाला गेला आहे.

 

 

 

असे असतानाच सत्तारांचा मतदारसंघ असलेला सिल्लोड हा पाकिस्तान होत चाललाय अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केला.

 

 

 

विशेष कार्यक्रमात दानवेंनी सत्तारांविरोधातील खदखद बोलून दाखवली आणि नव्या वादाला तोंड फुटले, त्यामुळे खरचं सिल्लोडच पाकिस्तान होतंय का? पाहू या संदर्भातील माझाचा स्पेशल रिपोर्ट.

 

 

 

सिल्लाडचे आमदार तथा मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंमध्ये नवा वाद तसा जुनाच. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे.

 

 

 

आणि याचं कारण ठरलंय दानवेंचा जालना लोकसभा मतदारसंघातून झालेला पराभव. सिल्लोड विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो.

 

 

 

पण सत्तार यांनी दानवेंचा प्रचार न करता काँग्रेसचा उमेदवार निवडून आणल्याचा आरोप होत आहे. यावरूनच रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांच्यावर हल्लाबोल करताना सिल्लोडचा पाकिस्तान होत असल्याचा आरोप केला.

 

 

 

त्यावर बोलताना अब्दुल सत्तारांनीही पलटवार केलाय. सिल्लोडला बदनाम कारण योग्य नाही, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यचा परिणाम भाजपला भोगावे लागतील असा थेट इशाराच सत्तारांनी दिला

 

 

 

सिल्लोड शहरात बहुतांश भाग मुस्लिम बहुल आहेत. प्रत्येक निवडणुकीत अब्दुल सत्तारांना मुस्लिम मतांचा एकगठ्ठा मतदान मिळते. पण याचवेळी मुस्लिमांपेक्षा सत्तारांना हिंदू मतदान अधिक मिळते.

 

 

 

 

तसेच गेली 25 वर्षे सिल्लोडचा मुस्लिम मतदार दानवेंना मतदान करत असताना त्यांना पाकिस्तान कसा आठवला नाही असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे. तर काहींनी दानवेंच्या आरोपाचं समर्थन केलं आहे.

 

 

 

सत्तार आणि दानवे हे वाद काही नवीन नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये या वादाची हमखास चर्चा होते. हे दोन्ही नेते कधी एकमेकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात,

 

 

 

 

तर कधी एकमेकांना पाडण्यासाठी पडद्यामागून ताकद लावतात. त्याचमुळे यंदा काँग्रेसच्या कल्याण काळेंनी दानवेंचा पराभव केल्यानंतर सत्तारांनी त्यांचा सत्कार केला.

 

 

 

सन 1984 ला अब्दुल सत्तार पहिल्यांदा ग्रामपंचायतीचे सदस्य झाले आणि राजकारणात आले. पुढे 2001 ला विधानपरिषदेवर गेले. नंतर विधानसभेवर आमदार आणि मग मंत्री झाले. 1999 पासून सिल्लोड हा मतदारसंघ जालना लोकसभेत येतो .

 

 

 

सत्तार आणि दानवे यांच्यातील कुरघडीचं राजकारण जरी जुनं असलं तरीही दानवे यांनी सिल्लोडचा पाकिस्तान म्हणून केलेला उल्लेख सत्तारांची भविष्यात राजकीय कोंडी करणार ठरणार असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *