ठेवीची रक्कम परत करण्यास टाळाटाळ, ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Order to file a case against Suresh Kute, chairman of Gnanaradha Multistate, for refusing to return the deposit amount

 

 

 

 

ठेवीदारांची रक्कम परत देण्यासाठी टाळाटाळ केल्याप्रकरणावरून ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

 

 

याबाबत माहिती अशी की ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्या विरोधात एका ठेवीदाराने दाखल केलेल्या एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम न्यायदाधिकारी एसपी वानखेडे यांच्या न्यायालयाने

 

 

 

गेवराई पोलीस ठाणे प्रमुखांना दिले आहेत ,गेवराई येथील जितेंद्र ओम प्रकाश मुंदडा यांना मुदत ठेवीवर भरघोस व्याजदर देण्यात येईल असे सांगत ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या शाखाधिकार्‍याने त्यांना बँकेत ठेवी ठेवण्यास सांगितले,

 

 

 

 

त्यामुळे मुंदडा यांनी सत्तावीस लाख पाच हजार रुपये ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीत मुदत ठेव स्वरूपात ठेवले, परंतु त्यांना आता घरगुती अडचणीमुळे पैशाची गरज पडली असता त्यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे शाखा अधिकारी

 

 

 

तसेच संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्याकडे मुदत ठेवीची रक्कम परत मागितली, परंतु ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली त्यामुळे मुंदडा यांनी 20 फेब्रुवारी रोजी त्यांना नोटीस पाठवली

 

 

 

 

परंतु तक्रारदार मुंदडा यांना ठेवीचे रक्कम अदा केली नाही ,त्यानंतर 28 फेब्रुवारी दुसरी नोटीस पाठवली व गेवराई पोलिसात लेखी तक्रार दिली. तसेच मुंदडा यांनी पोलीस अधीक्षकाकडे रजिस्ट्री पोस्ट पोस्टाने फिर्याद पाठवली

 

 

 

परंतु अद्याप गुन्हा दाखल झाला नाही, या प्रकरणात चौकशी देखील झालेली नाही त्यामुळे मुंदडा यांनी न्यायालयात धाव घेतली ,गेवराई येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात ऍड शरद काळे यांच्यामार्फत प्रकरण दाखल केली ,

 

 

 

 

या प्रकरणात अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे, त्या आदेशामध्ये गेवराई पोलीस ठाणे प्रमुखांना सध्याचे अर्जदार जितेंद्र ओम प्रकाश मुंदडा यांनी दाखल केलेले अर्जाचा विचार करण्याचे आदेश

 

 

 

 

न्यायालयाने दिलेले आहेत, हा विचार करताना यापूर्वी 8 फेब्रुवारी अन्य ठेवीदार योगेश मुंदडा यांच्या फिर्यादीवरून दाखल कलम 156 3 सीआरपीसी क्रिमिनल एम ए 21/ 2024 अन्वय गुन्ह्याचा संदर्भ घ्यावा

 

 

 

आणि त्यानुसार पुढील कारवाई करावी असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत, जितेंद्र मुंदडा यांच्यावतीने ऍड शरद काळे यांनी काम पाहिले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *