सहयोगी अधिष्ठाता डॉ. भगवान असेवार यांना मातृशोक
Associate Founder Dr. Condolence to Lord Asewar

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. भगवान असेवार यांच्या मातोश्री सौ. राहूबाई विठ्ठलराव असेवार यांचे दिनांक 5 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर अंतिमसंस्कार त्यांचे मुळगाव पोखर्णी (नृ), ता. जिल्हा परभणी येथे दिनांक 6 एप्रिल रोजी करण्यात आले. राहुबाई यांनी त्यांच्या पती समवेत मनी जिद्द बाळगून आणि मेहनतीने मुलांचे शिक्षण पूर्ण केले.
यापैकी एक म्हणजे डॉ. भगवान असेवार यांना विद्यापीठातील उच्च पदापर्यंत पोहोचविले. त्यांच्या या अशा अचानक जाण्याने डॉ. भगवान असेवार
यांच्या सह संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. राहुबाई यांच्या पश्चात त्यांचे पती श्री. विठ्ठलराव असेवार, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.