प्रचाराच्या सुरुवातीलाच जानकरांना परभणीत गटबाजीची डोकेदुखी ?
At the beginning of the campaign, the Jankars have a headache of factionalism in Parbhani?
परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी उमेवारी अर्ज भरला आहे. जानकर यांनी अर्ज भरताना मोठं शक्तिप्रदर्शन केलं होतं. अर्ज भरल्यानंतर महायुतीची जाहीर सभा झाली .
परंतु प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीच जिल्ह्यातील गटातटाच्या राजकारणातील रुसव्या फुगव्यांना जाणकारांना सामोरे जावे लागत आहे .
त्याचे असे झाले कि , गेल्या कित्येक दिवसापासून कार्यक्रम झाले नाहीत आता निवडणुकीचा बहार सुरु झाला त्यातल्या त्यात रमजान महिनाही सुरु असल्यामुळे
मुस्लिम मतांचे शक्तिप्रदर्शन करण्याची हीच योग्य वेळ ,कारण जिल्ह्यातील पुढाऱ्याकडे विकास दाखवायला नाही, कोणतंही ठोस काम नाही मग शक्ती दाखविणार तर कशी ?
हा प्रश्न असतो, त्यात रमजान असल्यामुळे इफ्तार पार्टीच्या नावाखाली सर्वसामान्य भोळ्या भाबड्या मुस्लिम समाजाला एकत्र करून आपली शक्ती दाखविण्याची युक्ती पुढारी नेहमीच करीत असतात .
तशीच युक्ती अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी करून त्यात महादेव जाणकारांना निमंत्रित करून आपली शक्ती दाखविली ,
मग एकाच गावातील कट्टर राजकीय वैरी ,सईद खान हि संधी कशी सोडणार ! , निर्णय झाला सईद खान कडूनही इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याचा,आता आपली जनतेत किती शक्ती आहे हे दाखविण्यासाठीच हि इफ्तार पार्टी!
जे दुर्रानीनी केले ते पुन्हा सईद खान करणारच ,विशेष बाब म्हणजे पुन्हा याही इफ्तार पार्टीला महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित केले होते.
दरम्यान महादेव जानकर हे सईद खान यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले नाहीत. ते का आले नाहीत याची माहिती समजू शकली नाही.
सईद खान सिंदे गटाच्या अल्पसंख्याक विभागाचे नेते आणि बाबाजानी अजित पवार गटाचे आमदार , जाणकार बाबाजणींच्या इफ्तारपार्टीला गेले मात्र सईद खानच्या इफ्तार पार्टीला गेले नाही त्यामुळे वाद चिघळला .
पाथरी शहरात बाबाजानी यांच्या वजनाची चर्चा वाढली तर मुख्यमंत्र्यांकडे वजन असूनही उमेदवाराकडे वजन नाही अश्या चर्चा सईद खांन बाबत सुरु आल्या आहेत,
मात्र निवडणुकीचा प्रचार सुरु होण्यापूर्वीच जाणकारांच्या डोक्याला हा गटबाजीचा टॅप सोसावा लागत आहे .
रमजान निमित्त शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाथरी येथे इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या इफ्तार पार्टीत शिंदे गटाचे जिल्हाभरातील आजी माजी नगरसेवक,
जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी आणि हजारो मुस्लिम बांधवांना निमंत्रित करण्यात आले होते.मात्र महादेव जानकर हे सईद खान यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले नाहीत
त्यामुळे सईद खान यांचे राजकीय वजन बाबाजानी दुर्रानीपेक्षा कमी झाल्याची सल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यात निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार बाबाजानी दूराणी आणि शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी आयाेजिलेल्या कार्यक्रमांपैकी महादेव जानकर यांनी दूराणींना पसंती दिल्याने खान यांचा गट नाराज झाला आहे.
दरम्यान दूराणी आणि खान यांच्यातील राजकीय वैमनस्याचा फटका परभणी लाेकसभा मतदारसंघात महयुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी डाेकेदुखी ठरणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
पाथरी येथील शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि बाबजानी दूराणी यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. महादेव जानकर यांना निवडणुकीच्या काळात शिंदे गटाची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार हे निश्चित.