शिवसेना V/s शिवसेना: ‘या’ मतदारसंघात एकमेकांशी भिडणार
Shiv Sena V/s Shiv Sena: Will clash in 'Ya' Constituency;

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 29 तारखेला संपली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 78 जागांवर उमेदवार दिले आहेत.
तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 96 जागांवर उमेदवार दिले आहेत. यापैकी ठाकरेंची सेना मुंबईत 20 जागा लढवत आहेत. तर शिंदेंच्या पक्षाने 14 जागी मुंबईत उमेदवार दिले आहेत.
यापैकी 11 जागांवर थेट उद्धव यांची सेना विरुद्ध शिंदेंची सेना अशी लढत होत आहे. मुंबईकर कोणाच्या बाजूने कौल देणार हे 23 तारखेला स्पष्ट होईलच. मात्र सध्या या 11 लढतींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
महाविकास आघाडीने लोकसभेमध्ये उत्तम कामगिरी केली. काँग्रेसने 13 तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने 9 जागा जिंकल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 8 जागा जिंकल्या.
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पक्षातच दोन गट पडले जे एकमेकांविरोधात लढले. राष्ट्रवादीमध्येही असेच काहीसे घडले आणि अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असे सामने पाहायला मिळेल.
विधानसभेलाही असेच चित्र दिसणार आहे. शिवसेनेच्या शिंदेंच्या पक्षामधील रवींद्र वायकर हे लोकसभेच्या निवडणुकीत खासदार झाल्याने ती जागा रिक्त झाली आहे.
शिवसेनेच्या शिंदेंच्या पक्षाचे सध्या आमदार असले्या सहा जागांपैकी चांदीवली वगळता अन्य पाच जागांवर दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत.
मुंबईत ठाकरेंचे एकूण 8 आमदार असून शिंदेंच्या सेनेने सहा आमदारांविरोधात उमेदवार दिल्याने शिंदे विरुद्ध ठाकरे अशी थेट लढत 11 मतदारसंघात होणार आहे.
शिवसेना विरुद्ध शिवसेना लढती कुठे आणि कशा?
मागाठणे
प्रकाश सुर्वे
उदेश पाटेकर
विक्रोळी
सुवर्णा करंजे
आ. सुनील राऊत
भांडुप पश्चिम
अशोक पाटील
आ. रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व
मनीषा वायकर
अनंत (बाळा) नर
दिंडोशी
संजय निरुपम
सुनील प्रभू
अंधेरी पूर्व
मूरजी पटेल
ऋतुजा लटके
चेंबुर
तुकाराम काते
आ. प्रकाश फातर्पेकर
कुर्ला
मंगेश कुडाळकर
प्रवीणा मोरजकर
माहिम
सदा सरवणकर
महेश सावंत
भायखळा
यामिनी जाधव
मनोज जामसुतकर
वांद्रे पूर्व
मिलिंद देवरा
वरुण सरदेसाई
राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने 152 जणांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 52 जणांना रिंगणात उतरवलं आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 87 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसने 104 जागांवर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकूण 138 जागांवर उमेदवार दिलेत.