‘या” उमेदवाराने दिला थेट काँग्रेसला पाच तारखेपर्यंतचा अल्टीमेटम

This candidate gave an ultimatum directly to the Congress till 5th date

 

 

 

काँग्रेसने सोलापूर मध्यची उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा 5 नोव्हेंबरला काँग्रेसबाबतचा राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे.

 

काँग्रेसने 4 तारखेपर्यंत आपल्या उमेदवाराचा अर्ज माघार घ्यावा अशी विनंती आडम यांनी केली आहे. अन्यथा काँग्रेसनं केलेलं सगळं षडयंत्र उघड करणार असल्याचा इशारा आडम यांनी दिला. त्यामुळं आता काँग्रेस काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

 

सोलापूर मध्यची जागा महाविकास आघाडीतून माकपला सोडण्यात येणार होती, मात्र काँग्रेसने स्वतःचा उमेदवार इथे जाहीर केला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष चेनत नरोटेंना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे.

 

या संदर्भात उद्या माकपचे शिष्टमंडळ सोनिया गांधी यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात विनंती करणार आहे. जर 4 तारखेपर्यंत काँग्रेसच्या उमेदवाराचे अर्ज माघार घेतलं नाही तर काँग्रेसने केलेलं सगळे षडयंत्र उघड करणार असल्याचं आडम यांनी सांगितल.

 

देवेंद्र फडणवीस हा मोठा माणूस आहेत. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही राहिलेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? असे नरसय्या आडम म्हणाले. मला जरं माणसं ओळखता आली नसती तर 50 वर्ष राजकारणात राहिलो असतो का?

 

असे म्हणत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिउत्तर दिलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडम मास्तर यांना माणसं ओळखता आली नाही

 

अशा पद्धतीची टीका केली होती. दरम्यान ‘मी काँग्रेसला ओळखण्यात ही कुठेही कमी पडलो नाही, सुशीलकुमार मुख्यमंत्री असतानाही काँग्रेसने आम्हाला जागा सोडली होती’ असे आडम यावेळी म्हणाले.

 

आता नेमकं काय झालाय याचा खुलासा मी पाच तारखेला करणार आहे. त्याआधी आम्ही सोनिया गांधींची भेट घेऊन काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे आडम म्हणाले.

 

सोलापूर मध्य विधानसभेची जागा महाविकास आघाडीने माकपला न सोडता काँग्रेसचा उमेदवार दिला आहे. त्यावरून माकपचे माजी आमदार

 

नरसय्या आडम यांनी काँग्रेसला पाच तारखेपर्यंतचे अल्टीमेटम दिला आहे. काँग्रेसनं उमेदवार मागे घेण्याची मागणी आडम यांनी केली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *