नागपूरची दंगल हा सूनियोजित कटाचा भाग,एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवतो

Nagpur riots are part of a well-planned conspiracy, a toxic minister openly spreads hatred in the society

 

 

 

महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे.”

 

असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केलाय . नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर

 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हा एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग असल्याचं सांगत अफवांकडे लक्ष न देण्याचा आवाहनही त्यांनी केलंय .

 

औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे जोरदार आंदोलन होत आहे. दरम्यान, नागपूर दंगलीवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर प्रहार होताना दिसतोय.

 

गृहमंत्री नागपूरचे असताना दंगल होतेच कशी असा सवाल करत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घेरले आहे. नागपूरची दंगल हा सूनियोजित कटाचा भाग असल्याचं सांगत महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत असल्याचं ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

 

महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे.

 

हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा.” ॲड. आंबेडकरांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचंही म्हटलं .

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले .सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला .

 

 

यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली .जमा व पांगवण्यासाठी गेलेल्या कर्तव्यपथावरील पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकातील अनेकांना जबर मार बसला .

 

यात तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत . आता या संपूर्ण भागात जमावबंदी व संचारबंदी लावण्यात आली आहे .

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *