खून प्रकरणात कॅनडातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा थेट अमित शहा यांच्यावरच आरोप

A senior official in Canada directly accused Amit Shah in the murder case

 

 

 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तवार्ता सल्लागार नेथाली ड्रौइन यांनी भारताच्या कॅनडातील कथित कारवायांची संवेदनशील माहिती अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला दिल्याची कबुली दिली आहे.

 

ड्रौइन आणि कॅनडाचे उपपराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी ही माहिती कळविली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॅनडातील कथित हिंसक कारवायांचे संचालन केल्याचा आरोप यातून केला आहे.

 

दरम्यान, उपपराष्ट्रमंत्री मॉरिसन यांनीही अमित शहा यांच्यावरील आरोपाला संसदेच्या सुरक्षा समितीसमोर पुष्टी दिली आहे.

 

कॅनडामधील ‘द ग्लोब अँड मेल’ने याबाबतील वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार, ड्रौइन यांनी संसदेच्या सार्वजनिक सुरक्षा समितीला माहिती देताना ही कबुली दिली.

 

विशेष म्हणजे ही माहिती कॅनडातील जनतेला प्रथम न सांगता अमेरिकेतील वृत्तपत्राला दिल्याचे समर्थनही त्यांनी (पान ८ वर) (पान १ वरून) केले आहे.

 

अशी संवेदनशील माहिती ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला द्यायला ट्रुडो यांच्या परवानगीची गरज नसल्याचे ड्रौइन यांनी सांगितले. तसेच, कुठलीही गोपनीय माहिती दिली नसल्याचा खुलासा

 

त्यांनी या वेळी सांगितले. भारताने कॅनडामधून सहा राजनैतिक अधिकारी माघारी बोलावण्याच्या एक दिवस आधी ही माहिती दिली गेली.

 

रॉयल कॅनडियन माउंटेड पोलीस आयुक्त दुहेमे यांनी सांगितले, की पुराव्यांनुसार, तीन हत्या प्रकरणांत भारताचा सहभाग आहे.

 

पण, केवळ निज्जर हत्या प्रकरणातच आरोपनिश्चिती केली आहे. या प्रकरणात आठ जणांवर खुनाचा, तर २२ जणांवर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. निज्जर हत्या प्रकरणात चार भारतीयांवर आरोप आहेत.

 

‘द ग्लोब अँड मेल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, केवळ अमित शहा यांच्यावर आरोप नव्हे, तर कॅनडात सप्टेंबर २०२३ मध्ये सुखदूलसिंग गिलच्या हत्येतही भारताचा कथित सहभाग असल्याचा आरोप

 

‘वॉशिंग्टन पोस्ट’कडे दिलेल्या माहितीत करण्यात आला आहे. या प्रकरणात कॅनडामध्ये कुठलीही आरोपनिश्चिती अद्याप झालेली नाही.

 

पोलिसांनी भारताच्या राजनैतिक अधिकारांवर जाहीर आरोप करण्यापूर्वी भारताशी सहकार्याचा प्रयत्न केल्याचे ड्रौइन यांनी सांगितले. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर १२ ऑक्टोबर रोजी सिंगापूर येथे बैठक झाली.

 

मात्र, या प्रकरणात भारत कॅनडाबरोबर सहकार्य करणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्व काही जनतेसमोर मांडण्याचा निर्णय घेतला. भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले असून, कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.

 

‘वॉशिंग्टन पोस्ट’ला माहिती देणे हा एक संवादनीतीचा भाग होता. मॉरिसन आणि मी ही नीती ठरविली होती. भारताबरोबर असलेल्या वादात

 

अमेरिकेतील प्रख्यात वृत्तपत्राला कॅनडाची भूमिका मिळावी, हा उद्देश होता. ही संवादनीती पंतप्रधान कार्यालयाने पाहिली होती. कुठलीही गोपनीय माहिती यातून दिली नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *