बंडखोरांना थंड करण्यासाठी बाळासाहेब थोरात थेट पोहोचले हेलिकॉप्टरने
Balasaheb directly reached Thorat by helicopter to cool down the rebels

नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभेतील चारही जागा काँग्रेसला सुटल्या आहेत. मात्र शहादा आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघात महाआघाडीकडून बंडखोरी झाली होती.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात हेलिकॉप्टरने शहरात दाखल झाले.
त्यांच्या दोन तासाच्या दौऱ्यात त्यांना बंडखोरांचं बंड थोपवण्यास यश आलं. जिल्ह्यातील सर्व बंडखोरांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महाआघाडी एकसंघ करण्यात थोरात यांना यश आलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सुटल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत उमेदवार तसंच नेत्यांवर विविध आरोप केले होते.
त्यासोबत नंदुरबार आणि शहादा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती.
अवघ्या काही महिन्यांआधी झालेल्या लोकसभेत महाआघाडी एकसंघ दिसत असताना विधानसभेचा तोंडावर वेगवेगळे गट पडले होते.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४ नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात दुपारी साडेबाराच्या दरम्यान हेलिकॉप्टरने नंदुरबार शहरात दाखल झाले.
त्यानंतर त्यांनी साक्री येथील महाआघाडीतील नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर शहादा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या घराकडे मोर्चा वळाला.
तिथे त्यांनी सुहास नाईक यांच्याशी चर्चा केली. तसंच नंदुरबार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ वळवी यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर शहादा मतदारसंघातून काँग्रेसचे सुहास नाईक यांनी, तर नंदुरबार येथून विश्वनाथ वळवी यांनी अर्ज माघार घेतला.