शिंदेसेनेचे 8 आमदार, 2 मंत्री संपर्कात; आदित्य ठाकरेंचा गौप्य्स्फोट

8 Shindesena MLAs, 2 Ministers in touch; Aditya Thackeray's secret explosion

 

 

 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 8 आमदार 2 मंत्री संपर्कात होते असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. झी 4 तासच्या जाहीर सभेत त्यांनी हा खळबळजनक दावा केलाय.

 

त आदित्य ठाकरेंनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, मंत्री आपल्या संपर्कात होते. जाहीर माफी मागण्याची त्या आमदारांची तयारी होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

एकनाथ शिंदेंसोबत असलेले शिवसेनेचे 8 आमदार आणि 2 मंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्यासाठी तयार होते असा  गौप्य़स्फोट  आदित्य ठाकरेंनी केलाय.

येण्यासाठी उत्सुक होते मग त्यांना घेतले का नाही? असा प्रश्न भरत गोगावले यांनी विचारला. घरी आलेली लक्ष्मी कोण नाकारेल का? जे सांगतातयत ते अत्यंत खोटे आहे.

 

लोकांमध्ये संभ्रम पसरवतायत. पण हे काही चालणार नाही. लाडक्या बहिणींनी आता ठरवलंय असे गोगावले म्हणाले. संपर्क केला होता मग प्रवेश का दिला नाही?

 

यांना फक्त नेरेटिव्ह सेट करायचाय. आमच्यासोबत यायला अनेकजण इच्छुक होते पण आम्ही कोणाला घेतले नाही, असं त्यांना दाखवून द्यायचंय.

 

कोणी यांच्याकडे जाणार नाही. हे खोटे बोलतायत हे सर्वांना माहिती आहे. बुडत्या नावेत कोण जाईल? असा प्रश्न संजय शिरसाट यांनी विचारला.

 

पक्ष सोडला तेव्हा आम्ही पण रडलो. तेव्हा आम्हाला बाळासाहेबांची आठवण झाली. वनगा यांनी उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं पण शिंदेंनी निवडून आणलं हे वनगा यांना माहिती असल्याचे ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामधून 2019 मध्ये ठाकरेंच्या कुटुंबातील सदस्य पहिल्यांदाच लढत असल्याने मनसेनं उमेदवार दिला नव्हता.

 

मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळं असून मनसेनं या ठिकाणी संदीप देशपांडेंना उमेदवारी दिली आहे. संदीप देशपांडे हे आदित्य ठाकरेंसमोर आव्हान निर्माण करतील असं मनसे नेतृत्वाचं म्हणणं असून

 

त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या हस्ते विधानसभेसाठीच्या मनसेच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं.

 

यावेळीही राज यांनी वरळीमधून लढण्यासाठी संदीप देशपांडेंना विशेष शुभेच्छा दिल्या. संदीप देशपांडेंनी ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढत असून घरोघरी जाऊन लोकांसमोर प्रश्न मांडत असल्याचं सांगितलं.

 

आपण आदित्य ठाकरेंना कठोर आव्हान देऊन असा विश्वास संदीप देशपांडेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आधीपासूनच या मतदारसंघाकडे मराठी मतदारांचं लक्ष

 

लागून राहिलेलं आहे. या मतदारसंघामध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामाना होत असून कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *