मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेआधीच आठ नेत्यांनी शिवसेना सोडली
Eight leaders left the Shiv Sena before the Chief Minister's meeting in Marathwada
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज होणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील प्रचार सभांच्या पूर्वसंध्येला कळंब शहरात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांचे पती तथा माजी नगरसेवक सागर मुंडे यांच्यासह आठ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्याला जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील उपस्थित होते.
शिंदे गटातील असंतोषाची ठिणगी आयात उमेदवार दिल्यामुळे लागली असून, त्याचा थेट परिणाम या पक्षांतरातून दिसून येत आहे. शिंदे गटाच्या या प्रमुख नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे मतदारसंघात मोठी चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेच्या आदल्या दिवशीच झालेल्या या प्रवेशामुळे आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या सभेची “हवा” काढल्याची चर्चा रंगली आहे.
प्रवेश सोहळ्यात सागर मुंडे यांच्यासोबत माजी नगरसेवक नंदू हौसलमल, बाबूभाई बागरेचा, शंकर वाघमारे, शफिक काझी, मनीष पुरी आदी आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला दहा-बारा दिवस शिल्लक असताना वरळी विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
उपविभागप्रमुख तसेच दोन शाखाप्रमुखांसह पाच पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी युवासेना प्रमुख आणि वरळी मतदारसंघातील उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाने शिवसेनेला हा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखाप्रमुख संतोष शिंदे,
शाखा प्रमुख श्रीकांत जावळे आणि शिंदे गटाचे नेते अन्वर दुर्रानी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी
प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘आमच्यावर प्रेम करणारे लोक हे पुन्हा एकदा आमच्यासोबत येत आहेत. तुमची निराशा होऊ देणार नाही, याची मी खात्री देतो. येणाऱ्या सरकारमध्ये तुमचा निश्चित हातभार लागेल असे मला वाटते’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.